क्राइम

पती आणि पत्नीच्या शारीरिक संबंधाचे चित्रीकरण केले आणि …..

Spread the love

जालना / नवप्रहार न्यूज नेटवर्क

अँड्रॉईड मोबाईल आल्यापासून सेल्फी, व्हिडीओ , रिल्स बनवण्याच्या प्रकारात भयंकर वाढ झाली आहे. हे व्हिडीओ किंवा रिल्स सोशल मीडियावर टाकून त्यावर जनतेच्या प्रतिक्रिया किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा प्रकार केला जात असतो. पण जसे प्रत्येक गोष्टीची चांगली आणि वाईट अशी बाजू असते त्याचा प्रमाणे या मोबाईल प्रकरणात सुद्धा मोबाईल चा गैरवापर ही बाब समोर आली आहे. घटना जालना जिल्ह्यातील मंठा येथील आहे. पती पत्नी शारीरिक संबंध ठेवत असतांना हा व्हिडीओ शूट करून महिलेला ब्लॅकमेल करम्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंठा तालुक्यातील एक दांपत्य 17 मे रोजी रात्री घरात झोपलेले होते त्यावेळी त्यांच्या शारीरिक संबंधाचे चित्रीकरण एका व्यक्तीने केले आणि त्यानंतर या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. आपली मागणी मान्य केली नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची देखील आरोपीने तिला धमकी दिली त्यानंतर महिलेला मोठा मानसिक धक्का बसलेला असून प्रकरण अखेर पोलिसांपर्यंत पोहोचलेले आहे.

मंठा पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार आरोपी संशयित आरोपी गजानन बाबू सिंग राठोड , दीपक राजू राठोड , संपत हरी राठोड या तीन जणांच्या विरोधात परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याची माहिती आहे . महिलेचे एकांतात क्षण रेकॉर्ड करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा असून आरोपींनी इतरही ठिकाणी असेच प्रकार केले आहेत का ? याचा देखील पोलिस सध्या शोध घेत आहेत .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close