सामाजिक

4 ते7 जानेवारीपर्यंत यवतमाळ येथे जैन बिजनेस कार्निवलचे आयोजन

Spread the love

यवतमाळ ( प्रतिनिधी)
यवतमाळ शहरातील जोश फाउंडेशन ही संस्था एक सामाजिक क्षेत्रात काम करणारी असून 2023 पासून यवतमाळ येथे बिझनेस कार्निवल चे आयोजन करीत असते. तसेच यावर्षी सुद्धा दिनांक 4 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत ( पोस्टर ग्राउंड ) समता मैदान यवतमाळ येथे आयोजन करण्यात आलेले आहे
ऑनलाइन खरेदीच्या काळात परंपरागत व्यवसायाला नुकसान पोहोचत असून काहींचे व्यवसाय डबघाईस आलेले आहे व त्यांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा व्यवसायिकांना चालना मिळण्याच्या दृष्टीने एका उत्सवाच्या माध्यमातून लोकांसमोर उपलब्ध करून त्यांच्या व्यवसायाला संजीवनी देण्याचे काम जोश फाउंडेशन करत आहे. या कार्निवलच्या माध्यमातून यवतमाळकरांना देखील विविध वस्तूंच्या खरेदी करण्याची संधी मिळणार असून विविध खाण्याच्या स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी तर मुलांना खेळण्याचा आनंद तर शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांना विविध स्पर्धेच्या माध्यमातून आपले कौशल्य दाखविण्यासह त्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे जिंकण्याची संधी सुद्धा येणार आहे. मास्टर शेफ, पोट डिझाईनिंग कॅनवोकं डिझायनिंग अशा अनेक प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन केल्या जाणार आहे.
या जैन बिजनेस कार्निवल मध्ये विविध गृहपयोगी वस्तू सौंदर्यप्रसाधने ऑटोमोबाईल क्षेत्रातील विविध गाड्या, रुचकर खाण्याचे पदार्थ या सर्वांची यवतमाळकरांना एक प्रकारची मेजवानीच आहे.
जैन बिजनेस कार्निवल 2024 हा जैन समाजातील युवक वर्गणी जरी आयोजित केलेला उपक्रम असला तरी तो सर्वच यवतमाळकरांसाठी व्यावसायिक दृष्ट्या प्रदर्शन आणि खरेदीसाठी खुला आहे. तरी दिनांक चार ते सात जानेवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या जैन बिजनेस कार्निवलचा यवतमाळ करांनी लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close