गळफास घेऊन ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

• मासलमेटा येथील घटना
• पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
भंडारा/लाखनी :- वयोमानानुसार मानसिक तणावातून राहते घरी नायलॉन दोरीने गळफास घेऊन ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी(ता.२८) सायंकाळी ७:०० वाजता दरम्यान उघडकीस आली. मृतकाचे नाव देवानंद शामराव रामटेके(६२) रा. मासलमेटा, तालुका लाखनी असे आहे. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
मृतकास अपत्य नव्हते तथा पत्नीचे १० वर्षापूर्वीच निधन झाल्यामुळे तो एकाकी जीवन यापण करीत असे. त्यामुळे तो मानसिक तणावात राहत होता. घटनेच्या दिवशी तो कोणालाही दिसला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी पाहिले असता राहत्या घरी गळ्याला नायलॉन रस्सिने गळफास घेतल्याचे अवस्थेत दिसून आल्याने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नेण्यात आले. कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकाऱ्याने तपासून मृत घोषित केले व घटनेची माहिती लाखनी पोलिसांना दिली. पोलिस उपनिरीक्षक अमोल तांबे, पोलिस शिपाई विलास खोब्रागडे घटनास्थळी गेले व सर्व सोपस्कार आटोपून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी पाठविण्यात आला. शव परिक्षणानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मन मिळवू देवानंद च्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. आतीष बागडे सावरी याचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी मर्ग क्रमांक ४८/२०२३ कलम १७४ सीआरपीसी नुसार पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार सुरेश आत्राम तपास करीत आहेत.