विदेश
Related Articles
काय झाले असे की….नवजात बाळाला पाहतच नर्स जोराने किंचाळली
March 10, 2025
Check Also
Close
इस्त्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही दिवसापासून युद्ध सुरू आहे. इस्त्रायल चे पायदळ सैन्य गाझा पट्टीत जाऊन हमास वर अटॅक करत आहे. या युद्धात हमास व्यतिरिक्त लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहदेखील इस्रायली सैन्यावर हल्ले करत आहे.आता या युद्धात आणखी एका संघटनेची एन्ट्री झाली आहे. येमेनची अतिरेकी संघटना हूतीने अधिकृतपणे इस्रायलविरुद्ध पॅलेस्टाईनच्या बाजूने युद्धाची घोषणा केली आहे.
लवकरच गाझामध्ये युद्धविराम न झाल्यास इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्याची धमकी हूती बंडखोरांनी दिली आहे. विशेष म्हणजे, 2014 मध्ये हूतीने येमेनच्या राजधानीसह देशाचा मोठा भाग ताब्यात घेतला. दरम्यान, सोमवारी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवर येमेनमधून इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी केल्याचा आरोप केला.
हूती बंडखोर कोण आहेत?
1980 च्या दशकात येमेनमध्ये हुतींचा उदय झाला. शिया मुस्लिमांची ही सर्वात मोठी आदिवासी संघटना आहे. अब्दुल्ला सालेहच्या आर्थिक धोरणांमुळे हूतींना राग आला, ज्यामुळे येमेनच्या उत्तरेकडील प्रदेशात अराजगता वाढली आणि सन 2000 मध्ये हूतींनी सैन्य तयार केले. अब्दुल्ला सालेहच्या सैन्याने 2004 ते 2010 दरम्यान हूतींसोबत 6 युद्धे लढली. 2011 मध्ये अरबांच्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध थांबले आणि सुमारे दोन वर्षे चर्चा सुरू राहिली. पण तोडगा निघाला नाही.
यानंतर, हूतींनी सौदी अरेबिया समर्थित नेते अहमद रब्बो मन्सूर हादी यांना सत्तेवरून हटवले आणि येमेनची राजधानी सना ताब्यात घेतली. हूतीकडे असलेले सैनिक टँक, अँटी-टँक क्षेपणास्त्रे, लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि अगदी तांत्रिक वाहने चालविण्यास सक्षम आहेत. गेल्या गुरुवारी हूतीने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले, मात्र इस्रायलने हा हल्ला परतून लावला. आता हूतीने युद्धाची घोषणा केली आहे, त्यामुळे युद्ध आणखी भीषण होण्याची शक्यता आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |