विदेश

116 प्रवाश्यांना घेऊन जाणारी बोट उलटली , 53 लोकांना वाचविण्यात यश 

Spread the love

गियाना/ नवप्रहार डेस्क

              116 प्रवाश्यांना घेऊन जाणारी बोट रात्रीच्या सुमारास उलटली. यातील 53 प्रवाश्यांना वाचविण्यात आले असून इतर लोकांचा शोध सुरू आहे. एमव्ही बारिमा ही बोट राजधानी जॉर्जटाऊनहून उत्तर अटलांटिक किनाऱ्यावरील पोर्ट कैटुमाकडे जात होती. यात कर्मचारी आणि प्रवासी बसले होते.

यादरम्यान पोमेरोन नदीजवळ बोट उलटली. बोटीतील 53 जणांना वाचवण्यात यश आले असून, अन्य बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री 11.01 वाजता मदतीसाठीचा संदेश (कॉल) मिळाला. सरकारी आणि खाजगी बोटींच्या मदतीने तात्काळ शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री जुआन एजहिल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले. या अपघातात कुणाच्या मृत्यूची माहिती अद्याप मिळाली नाही. जुआन एजहिल यांच्या म्हणण्यानुसार, बोटीमध्ये 250 लाईफ जॅकेट्स, दोन रिजिड लाईफ राफ्ट्स आणि सहा इन्फ्लेटेबल लाईफ राफ्ट्स होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close