अकोला येथील औद्योगिक क्षेत्रातील मंजूर भूखंडावर “उद्योग भवनाचे” बांधकामासाठी उद्योग मंत्री ना. उदय सामंतांची हीरवी झेंडी,
आमदार रणधीर सावरकरांची आग्रही मागणी मान्य…
अकोला / प्रतिनिधी
अकोला एमआयडीसी क्षेत्रामध्ये उद्योग भवन इमारत उभी करण्याचा प्रस्ताव राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी आमदार रणधीरसावरकर
यांच्या मागणीची दखल घेऊन या आठवड्यात दुसरी भेट आपल्याकरांना दिली आहे यापूर्वी विभागीय औद्योगिक कार्यालय मंजूर केला यानंतर आज त्यांनी उद्योग भावनांसाठी व,
जागा उपलब्ध करून देऊन.
उद्योग जगताला व पश्चिम विदर्भातील विकासाला चालना दिली आहे याबद्दल समस्त अकोले जिल्हा के राज्या वतीने आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित दादा पवार उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार व अभिनंदन केले आहे,
औद्योगिक क्षेत्रात उद्योग भवनाची निर्मिती करण्यास प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंजूर करुन सदर कामाकरिता अभियांत्रिकी विभागाकडून ऑनलाईन ई-निविदा प्रसारीत करण्यात आल्या होत्या, त्यानुसार प्राप्त निविदांच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव मुख्यालयास सादर करण्यात आला. सदर प्रस्तावास अद्याप मान्यता देण्यात आली नसल्याकारणाने सदर उद्योग भवनाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्यास होणारा विलंब लक्षात घेता सदरचा विलंब दुर करण्यासाठी सादर निविदा प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यात यावी, करिता आमदार रणधीर सावरकर यांनी उद्योग मंत्री मा. उदय सामंत यांना सविस्तर पत्र लिहून विनंती केली होती, सदर उद्योग भवनाचे बांधकामाकरिता अकोला विकास केंद्रातील सुविधा भुखंड क्रमांक १ व सुविधा भुखंड क्रमांक ३ चे एकूण क्षेत्रफळ ७४२२.२० चौ. मीटर आरक्षित करण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झालेलेहोते, सदर दोन्ही भुखंड उद्योग भवनाकरिता राखीव ठेवण्यास नियोजन दृष्टया हरकत नसल्याबाबतचे अभिप्राय मुख्य नियोजक, म.औ.वि.म. मुंबई यांनी सुद्धा नोंदविलेले होते, परंतु मा. अधिक्षक अभियंता अमरावती यांच्याकडून प्रस्ताव परत करण्यात आलेला आहे असे समजल्याने “उद्योग भवन” निर्मितीस विलंब दुर व्हावा करीता आमदार सावरकरांनी मंत्री केलेली मागणी ला यश प्राप्त झाला आहे व सातत्याने अकोला जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळत आहे.
उद्योग भवनामध्ये उद्योजकांना आवश्यक असलेल्या सर्व अनुषंगिक सेवा एकाच इमारतीत उपलब्ध करुन देण्यात येत असल्याने उद्योग भवनाची निर्मिती औद्योगिक क्षेत्रात होणे गरजेचे आहे, ही बाब आमदार सावरकरांनी स्पष्ट केली, औद्योगिक क्षेत्रातील उद्योग भवनाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाल्याने उद्योजकांच्या वतीने आमदार रणधीर सावरकरांनी उद्योग मंत्र्याप्रती आभार व्यक्त
केले.
अकोला एमआयडीसी असोसिएशन तसेच विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स व विविध उद्योजकांनी आमदार रणधीर सावरकर यां तिचे यांच्या सक्रियतेचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे व जिल्ह्याच्या विकासासोबत सर्वसामान्य नागरिकांना उद्योजकांना सेवा उपलब्ध करण्यासाठी उद्योग भवन उपयोगी पडेल असा विश्वास व्यक्त केला आहे. महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असल्याच्या
प्रत्यय पुन्हा आलाय