शैक्षणिक

वऱ्हाडी कवी डॉ.रावसाहेब काळे यांच्या कवितेचा विद्यापीठ अभ्यासक्रात समावेश

Spread the love

 

अकोला ः संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमात विद्यापीठाचा कार्यकक्षेत येणाऱ्या जिल्ह्यातील लेखक, कवी, कथा व कादंबरीकारांच्या साहित्याचा समावेश केल्याचे दिसून येत आहे. त्यातच बी ए भाग २ सेमिस्टर -४ करिता मराठी भाषा या विषयाकरिता या “व-हाडी कविता अभ्यासक्रमाच्या पुस्तकात लाेणी येथील वर्‍हाडी बोलीचे अभ्‍यासक डॉ० रावसाहेब काळे यांची “बईन झाली लाळकी” ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे.


यापूर्वी काळे यांचे बी.एसी. भाग एक सेमिस्‍टर दोन करिता मराठी भाषा आणि निवडक बोलींचा अभ्‍यास हा लेख, तसेच एम. ए. मराठीच्‍या अभ्‍सासक्रमातील संदर्भ ग्रंथसूचीमध्‍ये साहित्‍य पंढरीचा विठ्‍ठल, समकालीन ग्रामीण साहित्‍य या पुस्‍तकांचा समावेश झालेला आहे. काळे यांचे समकालीन ग्रामीण साहित्र : डॉ0 विठ्ठल वाघ गौरव ग्रंथ, भुलाबाईची गाने, साहित्य पंढरीचा विठ्ठल, वर्‍हाडी बोलीचा भाषाशास्त्रीर अभ्रास इत्‍यादी पुस्‍तके प्रकाशित आहेत. त्‍यांनी लेखन व दिग्‍दर्शन केल्‍या नाटकांपैकी कुत्रीची हिसेवाटनी, लांबजाना, देवघरातली टिव्‍ही इत्‍यादी नाटके प्रकाशित झालेली आहेत. वर्‍हाडी बोलीतील लोककथा, हे पुस्‍तक साहित्‍य अकादमीने प्रकाशित केलेले असून नागबार्‍या हे पुस्‍तक साहित्‍य अकादमी लवकरच प्रकाशित करणार आहे. कुत्रीची हिेसवाटनी या नाटकाला महाराष्‍ट्र सरकारचा यशवंतराव चव्‍हाण वाङ्‌मय पुरस्‍कार मिळाला आहे. तसेच, साहाय्‍यक संशोधक म्‍हणून काम केलेल्‍या बोलीप्रकल्‍पाचे प्रकाशान राज्‍य मराठी विकास संस्‍थेने वर्‍हाडी बोलीचा शब्दकोश (खंड एक), वर्‍हाडी बोलीचा शब्दकोश (खंड दोन), वर्‍हाडी बोलीचा म्हणीकोश, वर्‍हाडी बोलीचा वाक्प्रचार कोश असे चार खंड केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close