सामाजिक

वाघाच्या हल्यात महिला ठार, देवलापार  येथील घटना 

Spread the love

नागपूर / विशेष प्रतिनिधि

          नागपूर जियातील रामटेक तालुक्यातील देवलापार येथे शेतात काम करत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुक्ता जोगड्या मरसकोल्हे असे महिलेचे नाव आहे.  शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. हल्ला इतका भीषण होता, की त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेतली. देवलापार व आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाच्या हालचाली वाढल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या ताज्या घटनेनंतर परिसरात दहशतीचे सावट अधिक गडद झाले आहे. संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून विशेष पथक तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close