कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या हिवरखेड येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
कॅप्टन सुनील डोबाळे यांचे चंडिका देवीला “साकडे”
अकोट प्रतिनीधी
अकोट – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या चंडिका चौक हिवरखेड येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ७ नोव्हेंबर रोजी कॅप्टन सुनील डोबाळे व जिल्हा उपाध्यक्ष श्रीरंग तट्टे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रचार कार्यालया उद्घाटन पूर्वी कॅप्टन साहेबांनी ग्रामदैवत असलेले चंडिका देवी यांच्या मंदिरात जाऊन चंडिका देवीचे आशीर्वाद घेतले व जनतेची सेवा करण्याकरता चंडिका देवीला साखळे घातले. त्यानंतर विधिवत गावामधून रॅली काढत कार्यालयापर्यंत ढोल ताशाच्या गजरात असंख्य लोकांच्या सहभागात कार्यालयात जाऊन मग उद्घाटन सोहळा पार पडला. व तिथे विवीध मान्यवरांची भाषणे पार पडली.त्यानंतर आपला दौरा पायी चालत उर्वरित हिवरखेड मध्ये मुख्य रस्त्यावरून जाऊन भवानी मातेच्या मंदिराजवळ भवानी मातेलाही आपले विजयाचा साखळ घातलं आणि रस्त्यामध्ये जे जे लोक स्वागतसाठी उभी होती,त्यांचे आशीर्वाद मागत तुमचे सेवेसाठी मला पाच वर्ष निवडूण द्या आणि विकास काय असतो याचा प्रत्येय तुम्हीच घ्या असे त्यांनी जनतेला प्रत्यक्ष भेटीदरम्यान आश्वासन दिले .