समुद्रात जाणे तिच्या जीवावर बेतले होते पण …..
मुंबई / नवप्रहार मीडिया
रोजच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा म्हणून काही लोक पर्यटन स्थळावर फिरण्यासाठी जात असतात. त्या ठिकाणी समुद्र किनारा किंवा धबधबा अथवा नदी असली की तरुण तरुणींना त्या पाण्यात जाऊन भिजण्याचा मोह आवरत नाही,. पण।काही ठिकाण खूपच घातक असतात.त्यामुळेत्या ठिकाणी जाऊ नये अश्या प्रकारचे सूचना बोर्ड त्या ठिकाणी असतात. पण त्याकडे मस्तीच्या मड मध्ये असलेली तरुणाई कानाडोळा करते . पण हा कानाडोळा किती कहाग पडू शकतो हे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओतून लक्षात येऊ शकते.
नुकताच व्हायरल झालेला एक समुद्रातील भयावह व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही समुद्रात असं धाडस करताना दहा वेळा विचार कराल.
या व्हिडीओमध्ये पाहू शकता, समुद्र दिसत आहे, समुद्रात मोठ मोठ्या लाटाही उसळताना दिसत आहे. यावेळी काही तरुण समुद्राच्या पाण्यात पोहत आहेत. यावेळी पिवळ्या साडीत एक महिलाही तिथे दिसत आहे. सुरुवातीला किनाऱ्यावर उभी असलेली महिला हळू हळू पाण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात जाते. मात्र तिचा हाच आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. पाण्याचा अंदाज न आल्यानं ती खूप पुढे जाते. यावेळी खवळलेल्या लाटांसमोर तिचा टिकाव लागत नाही. आणि ती लाटेसोबत समुद्रात खेचली जाते. ती उठण्याचा प्रयत्न करते तेच पुढच्याच क्षणी प्रचंड मोठी लाट येते आणि तिला आत खेचते.
दरम्यान किनाऱ्यावर असलेला तरुण हे सगळं पाहतो आणि तिच्या मदतीसाठी धावतो, बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर महिलेला सुखरुप पाण्याबाहेर काढण्यात येत. त्या तरुणाचं लक्ष गेलं म्हणू महिलेचे प्राण वाचले अन्यथा महिलेचा जीव गेला असता. हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकते हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे.




