त्याचा आनंद काही दिवसच टिकला ; दूष्यंत ची निर्घृण हत्या
जयपूर / नवप्रहार मीडिया
मागील काही काळापासून जोडीदार निवडण्यासाठी काही ॲप्स आले आहेत. या ॲप वर जाणून अनेक तरुण – तरुणी आपला मनपसंत जोडीदार निवडतात. यापैकी टिंडर ॲप एक. पण हाच ॲप दुष्यंत साठी ‘ मौत का कुआं ‘ ठरला आहे. या ॲप वर मैत्री झालेल्या तरुणीने दुष्यंत ला गोडगोड बोलून निश्चित ठिकाणी घर घ्यायला लावले. आणि त्यानंतर त्याची मित्रांसमवेत हत्या केली. त्यापूर्वी त्यांनी दुष्यंत क्या आई वडिलांकडून तीन लाखांची खंडणी देखील उकल्ली होती.
दुष्यंत २८ याची टिंडर ॲप वर प्रिया नामक तरुणी सोबत मैत्री झाली. या ॲप वर तीन महिने चॅटिंग केल्यावर प्रिया ने दुष्यंत कडे भेटीची ईच्छा व्यक्त केली. आणि त्याला भाडे तत्वावर घर घ्यायला सांगितले. दूष्यंतने प्रियाचं ऐकलं आणि तसं करायला तयार झाला. पुढे काय घडणार आहे हे त्याला माहीत नव्हतं.
दुष्यंत शर्मा आणि प्रिया सेठ यांची प्रेमकहाणी २०१८ मध्ये सुरु झाली होती. मात्र दुष्यंतची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी प्रिया सेठ तिचा प्रियकर दिक्षांत कामरा आणि लक्ष्य वालिया या तिघांनाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावणी करण्यात आली. हा निर्णय ऐकून प्रिया सेठला रडू येऊ लागलं. मात्र ही भयंकर घटना कशी घडली ते जाणून घेऊ.
प्रिया सेठने टिंडर या मोबाइल डेटिंग अॅपच्या माध्यमातून जयपूरमध्ये राहणाऱ्या दुष्यंतशी दोस्ती केली. तीन महिने चॅटिंग केल्यानंतर हे दोघं भेटू लागले. प्रियाला वाटलं की दुष्यंत शर्मा हा पैसैवाला माणूस आहे. दुष्यंतही तिच्याशी खोटंच बोलला होता. लग्न झालेलं असूनही त्याने तिला आपण एकटेच आहोत असं सांगितलं. प्रियाने दुष्यंतचं अपहरण करण्याचा कट रचला. २ मे २०१८ रोजी प्रियाने दुष्यंतला फोन करुन भेटायला बोलवलं त्याला जयपूरच्या बजाज नगरमध्ये असलेल्या घरी नेलं. तिथे तिचे प्रियकर दीक्षांत कामरा आणि आणखी एक तरुण लक्ष्य वालिया उपस्थित होते. दुष्यंतला तिथे आणून दुष्यंतच्या आई वडिलांकडे १० लाखांची खंडणी या तिघांनी मागितली.
तीन लाखांची खंडणी घेऊनही हत्या
दुष्यंतचे आई वडील घडल्या प्रकारामुळे घाबरुन गेले होते. त्यांनी पोलिसांकडे जाण्याऐवजी तीन लाख रुपये गोळा केले आणि ते प्रियाने सांगितलेल्या बँक अकाऊंटवर जमाही केले. खंडणी मिळाल्यानंतर प्रिया दीक्षांत आणि लक्ष्य यांना असं वाटलं की आता दुष्यंतला सोडून दिलं तर हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाईल आणि आपल्याला अटक होईल. त्या भीतीतून या तिघांनी गळा दाबून दुष्यंतची हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि दिल्लीतल्या आमेर डोंगररांगामध्ये फेकला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर चाकूने अनेक वार करण्यात आले. तसंच पुरावे नष्ट करण्यासाठी फ्लॅटही धुऊन काढला. मात्र पोलिसांनी त्यांना याच फ्लॅटमधून ४ मे २०१८ रोजी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुष्यंत शर्मा हत्याकांडाची सूत्रधार प्रिया सेठ आहे. तिचा प्रियकर दिक्षांत कर्जबाजारी झाला होता त्यामुळे तिने दुष्यंतला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. आता या प्रकरणी कोर्टाने या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. टिंडर अॅपवरची एक ओळख आणि पुढे घडलेल्या या घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत.