सामाजिक

त्यांची ती भेट ठरली शेवटची भेट 

Spread the love

त्याने  क्षणात अख्ख कुटुंब गमावलं

आंबेगाव / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

                मुलांनी खूप शिकावं आणि मोठा माणूस बनावं असं सगळ्याच पालकांचे स्वप्न असते.ते स्वप्न मोजकेच मुलं पूर्ण करतात.पण प्रत्येक पालक मात्र मुलांच्या भविष्यासाठी आशावादी असतात. आणि त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे शिक्षण घेण्याची मुभा देतात. मुलाच्या भविष्याला आणि शिक्षणाला घेऊन एक कुटुंब असेच नागपूरला आले होते. मुलाला नागपूर ला सोडून ते परतीच्य प्रवासात निघाले होते. पण काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि एका क्षणात तो पोरका झाला . .

समृद्धी महामार्गवर झालेल्या अपघातात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एकाच कुटुंबातील 3 जण ठार झाले असून.निरगुडसर येथील गंगावणे कुटुंबीयांतील नवरा बायको व मुलीचा मृत्यु झाला आहे.यामुळे संपूर्ण निरगुडसर गावावर व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयावर शोककळा पसरली आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामुळे बारामतीतील काळे कुटुंबीयांवर देखील शोककळा पसरली आहे. अॅड. अमर काळे यांची बहीण कांचन गंगावणे त्यांचे पती कैलास गंगावणे आणि मुलगी सई गंगावणे या तिघांचाही या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी पहाटे आल्यानंतर काळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

नागपूरहून पुण्याच्या दिशेने गंगावणे कुटुंब प्रवासासाठी विदर्भ ट्रॅव्हल्स बसने निघाले होते. गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय परतीच्या दिशेने निघाले होते त्याच वेळेस त्यांच्यावर काळाने घाला घातला. साई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थीनी होती तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता आणि ती वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी होती. या तिघांचाही फोन लागत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर, बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अमर काळे यांनी शोध सुरू केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनील कुमार मुसळे यांनी देखील तातडीने हालचाल करून या अपघातात बाबत बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांची संपर्क साधून तातडीने माहिती घेतली. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये या तिघांचेही नाव असून त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अपघात स्थळी असल्याने हे तिघे या बसमधून प्रवास करत होते, अशा निष्कर्षाप्रत पोलीस आलेले आहेत. दरम्यान काळे कुटुंबीयांनी गंगावणे कुटुंबीय याच बसमधून प्रवास करत होते या वृत्तास दुजोरा दिला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close