क्राइम

अरे महाराष्ट्रात हे चाललंय तरी कायं ?.. खरात पेक्षाही  मोठं कांड आलं समोर 

Spread the love

सातपूर / विशेष प्रतिनिधी

राज्यात लैंगिक शोषणाच्या एका मागून एक उघड होणाऱ्या घटनांमुळे संतांची आणि शूरवीरांची भूमी असलेल्या राज्याला कोणाची नजर लागली असा प्रश्न सहज उपस्थित होत आहे.  एकीकडे लिंगपिसाट अशोक खरात याचे प्रकरण ताजे असतानाच लैंगिक शोषणाचे एका मागून एक असे प्रकरण उघड होत आहे. खंडणी मागितल्याची तक्रार करणारा रवींद्र एरंडे हा खरात पेक्षाही मोठा वासनांध असल्याचे समोर आले आहे. फिर्यादी म्हणून पोलिसांसमोर आलेला एरंडे आता आरोपी बनला आहे. त्याच्याकडे १२१ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने पोलिस खाते चक्रावले आहे. आणि पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने चौकशीला सुरवात केली आहे.

अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा सातपूर पोलिसांनी पर्दाफाश करत चार संशयितांना अटक केली आहे. मात्र या घटनेनंतर खंडणी प्रकरणातील फिर्यादी रवींद्र गणपत एरंडे (६३), रा.

अशोकनगर, सातपूर यानेच विविध महिलांसोबत आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे व्हिडीओ चित्रण केले, अशी तक्रार आल्याने पोलिसांनी एरंडेलाच बेडचा ठोकल्या, पीडितेच्या तक्रारीवरुन लैंगिक शोषण, एट्रॉसिटी कायद्यान्वये शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाल्याने अश्लील व्हिडीओकांडाला वेगळे वळण मिळाले आहे.

माझ्याकडून १२ लाखांची खंडणी मागितल्याची फिर्याद एरंडेनेच दिली होती. मात्र, तोच आरोपीच्या पिंजऱ्यात अडकला. एरंडेकडील १२१ आक्षेपार्ह व्हिडीओ पाहून यंत्रणा चक्रावली आहे. यात त्याने पीडित महिलांचे काढलेले व्हिडीओ देखील आहेत. भोंदू अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच अशाच स्वरूपाचे प्रकरण पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.

टॅब चोरून एरंडेचा भांडाफोड

खंडणी मागणारा तरुण हा फिर्यादी एरंडेकडेच कामाला होता. त्यानेच टॅब चोरून एरंडेचा भांडाफोड केला. स्वतःला पत्रकार म्हणणाऱ्या रवींद्र गणपत एरंडे याच्या तक्रारीनुसार आरोपींनी एरंडेचा टॅब चोरी करून त्यामधील फिर्यादीचे वैयक्तिक आणि संवेदनशील अश्लील व्हिडीओ व फोटो मिळवले. त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाखांची खंडणी एरंडेकडे मागितली. त्यातील दहा हजार रुपये देण्यात आले होते. आकाश पुंडलिक बकरे, रा. सातपूर, प्रकाश पानपाटील, रा. सातपूर, सूरज सुनील गवई, रा. मोतीवाला कॉलेजजवळ, आणि श्रीपत शिंदे, रा. खंबाळे, ता. त्र्यंबके यांना एरंडेकडून पैसे स्वीकारता ताब्यात घेतले आहे. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीकडून दोन पेन ड्राइव्ह आणि मोबाइल ताब्यात घेतला आहे.

नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार

फिर्यादी रवींद्र गणपत एरंडे याच्यावर सातपूर पोलिसात लैंगिक अत्याचार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. पीडितेच्या महिलेच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एरंडेने नाशिक व इगतपुरी परिसरातील हॉटेलमध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केले, तसेच महिलांसोबतचे अश्लील व्हिडीओ तयार केले.

खंडणी उकळणाऱ्या त्या चार संशयित आरोपीकडून हार्डडिस्क, दोन पेन ड्राइव्ह आणि ४ मोबाइल ताब्यात घेतले आहेत. अटकेतील या चारही संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी.

खंडणी प्रकरणातील फिर्यादी रवींद्र एरंडे महिलांना उद्योग सुरू करून देण्यासाठी कन्सल्टेंट म्हणून काम करायचा. मिळालेल्या माहितीनुसार सहा महिलांचे ५८ अश्लील व्हिडीओ पोलिसांनी तपासले. एरंडेबद्दल तक्रार करण्याचे पीडित महिलांना पोलिसांनी आवाहन केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close