हटके

    अरे बाबो …! ऐकलं का ? विद्यार्थिनीने ट्युशन फी दिली नाही म्हणून शिक्षकाने तिच्याशी केले लग्न

Spread the love

      शिक्षक आणि विद्यार्थि यांच्यातील प्रेम संबंधाचे अनेक किस्से व्हायरल होत असतात. यातील अनेक विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकांशी लग्न देखील करतात. त्यांचे एकमेकांवर प्रेम असते म्हणून तसं घडत. पण सध्या जो प्रकार घडला आहे त्यावर काय भाष्य करावे हे समजण्या पलीकडे आहे.

पण, आता या शिक्षकांचे लग्न सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत आहे. पण, हा शिक्षक नेमका कुठला आहे हे मात्र कळत नाही. विशेष म्हणजे आपल्या लग्नाची बातमी त्याने स्वत:च सांगितली आहे.

सर्वत्र प्रसारीत होणा-या व्हिडिओमध्ये हा शिक्षक सांगतो की ही माझी स्टुडंट होती. हिच्याकडे १० हजार रुपये ट्युशन फी बाकी होती. त्यामुळे करायचं काय तर मी तीच्य़ाशी लग्नच केले. केवळ ट्युशन फी दिली नाही म्हणून ५० हून अधिक वय असलेल्या या शिक्षकांने केलेले हे लग्न टीकेचा विषय बनला आहे.

लग्न करणारा हा शिक्षक धोती व कुर्ता घातलेला आहे. तर त्याची ही स्टुंडंट ही शाळेच्या ड्रेसवर दिसत आहे. शिक्षकांचे विद्यार्थींनीवर प्रेम जडते त्यावेळेस वयाचे बंधन नसते. पण, ही प्रेमाची गोष्ट नाही तर थेट हा व्यवहार केला व त्यातून हे लग्न केल्याचे दिसते. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच टीका होत आहे.

 

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close