दिव्यांग विज्ञानकन्येची उत्तुंग झेप
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षण विभाग पंचायत समिती घाटंजीच्या वतीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीतून दिव्यांग गटातून जिल्हास्तरावर निवड.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
आयोजन शिप्रमं कन्या शाळा घाटंजी येथे करण्यात आले होते.या विज्ञान प्रदर्शनीमध्ये दिव्यांग गटातून जि प मराठी शाळा कुर्ली येथील विज्ञानकन्या जानवी किशोर आंबेपवार या विद्यार्थिनीने भावी वैज्ञानिकाच्या स्वरूपात उत्तुंग झेप घेतली असून जिल्हास्तरावर तिची निवड करण्यात आली आहे.
या यशाचे श्रेय शाळेतील मुख्याध्यापक विलास किरणापुरे,विनायक बोकडे, दीपक महाकुलकर, संजय आडे, कुलदीप डंभारे ,अमित राठोड ,वर्षा गुंडेवार, तृप्ती ठाकरे ,विज्ञान शिक्षिका सुप्रिया पडगिलवार, आई-वडील यांना दिले आहे. या कालावधीत सर्व शिक्षक, समावेशित शिक्षण विभागाचे साधन शिक्षक श्री स्वप्निल वातीले, प्रवीण ठाकरे यांच्या विशेष नियमित प्रयत्न आणि मार्गदर्शनामुळे विज्ञानकन्येचे जिल्हास्तरावरचे स्वप्न पूर्ण झाले आहे. विद्यार्थिनी व सर्व शिक्षकाचे श्री विजय साळवे तहसीलदार घाटंजी,श्री असलमभाई गिलाणी संचालक शिप्रमं घाटंजी,श्रीमती आलीया शहजाद संचालिका शिप्रमं घाटंजी,डॉ. एम ए शहजाद प्राचार्य गिलानी महाविद्यालय घाटंजी,श्री प्रदीप गोडे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जि प यवतमाळ,श्री सुधाकरजी वांढरे गटशिक्षणाधिकारी घाटंजी, सौ.निता गावंडे विज्ञान पर्यवेक्षक जि प यवतमाळ, सौ संगीता मुनेश्वर मुख्याध्यापिका शिप्रमं कन्या शाळा घाटंजी, विस्तार अधिकारी सुनील बोंडे, विशाल साबापुरे, विज्ञान समन्वयक मानव लढे, आकाश कवासे, श्रीकांत पायताडे,अर्चना दिघडे, सर्व बिआरसी व सर्व केंद्रप्रमुखांच्या वतीने भावी यशासाठी प्रमाणपत्र, मोमेंटो,पुष्पगुच्छ शुभेच्छा देऊन अभिनंदन स्वागत सत्कार करण्यात आला आहे.