सामाजिक

अहमदनगर महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत मार्गदर्शन

Spread the love

 

नोकरी करून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मोठा फायदा – उपप्राचार्य विनीत गायकवाड

नगर- विद्यार्थ्याला एखाद्या पदवीचे शिक्षण घेताना कोणत्याही टप्प्यावर अभ्यासक्रम सोडावा लागला तरी त्याने घेतलेले शिक्षण वाया जाणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार क्रेडिट्स आणि प्रमाणपत्र मिळू शकेल. त्यानुसार विद्यार्थ्याला रोजगाराच्या संधीही खुल्या होतील. या नव्या धोरणात कोणत्याही टप्प्यावर अभ्यासक्रम सोडण्याची किंवा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची मुभा असल्याने नोकरी करून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल, असे प्रतिपादन उपप्राचार्य विनीत गायकवाड यांनी केले.

अहमदनगर महाविद्यालय अहील्यानगर मा. प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली  (स्कूल कनेक्ट 2.0) महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अहमदनगर कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक सदस्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्यातील सहभागीत्व याबद्दलचे  अहमदनगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य विनीत गायकवाड यांनी मार्गदर्शन आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. दिलीप भालसिंग, डॉ. नोवेल पारगे, उपस्थित होते

पुढे उपप्राचार्य गायकवाड यांनी  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील नवीन अभ्यासक्रम , छएझ मार्गदर्शक तत्वे , याबाबत प्राध्यापक आणि सदस्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विलास नाबदे यांनी  केले.तर डॉ.रविकिरण लाटे यांनी आभार मानले.

 

 

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close