शेती विषयक
गारपीट व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्या
देवळी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मांडला ठिय्या
– देवळीत युवा संघर्ष मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन
– शेकडो शेतकरी आंदोलनात दाखल
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
आशिष इझनकर
: रब्बी हंगामात देवळी तालुक्यात गारपीट होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. खरीप आणि रब्बी दोन्ही पिके हातची गेल्याने पीक विम्यावर शेतकऱ्यांची भिस्त होती. रब्बी हंगामात गहू , हरबरा ही पिके गारपिटीमुळे हातची गेली. पण अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाहीए. युवा संघर्ष समितीने देवळी तहसील कार्यलयाच्या समोर ठिय्या आंदोलन करून याकडे लक्ष वेधले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहेय.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1