ब्रेकिंग न्यूज

अन…. मंगरूळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे  फडणवीस यांच्या दौऱ्यात खोळंबा निर्माण करण्याचा बेत फसला 

Spread the love
ठाणेदार आणि त्यांच्या चमूचे अभिनंदनीय कार्य 
धामणगाव रेल्वे / विशेष प्रतिनिधी 
                        स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ता कपिल पडधान यांचा उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात खोळंबा निर्माण करण्याचा बेत ठाणेदार मंगरूळ दस्तागिर सुरज तेलगोटे आणि त्यांच्या चमूने त्यांना नाचनगाव (पुलगाव ) येथून ताब्यात घेऊन हाणून पाडला आहे. ठाणेदार तेलगोटे आणि त्यांच्या चमुच्या या अभिनंदनीय कार्याची प्रशंसा होत आहे.
                        मागील काही दिवसात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ता कपिल पडधान यांनी विविध आंदोलने केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती  दौऱ्यावर असताना त्यांनी त्यांच्या वाहनावर कांदे फेक आंदोलन करण्याचे ठरवले होते पण त्यावेळी पोलिसांनी त्यांचा हा बेत हाणून पाडला होता.
                     आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धामणगाव।रेल्वे दौऱ्यावर आहेत. यावेळी सुद्धा पडधान यांनी ॲम्बुलन्स मध्ये येऊन त्यांच्या कार्यक्रमात खोळंबा निर्माण करण्याचे प्लॅनिंग केले होते. पण याबद्दल सदैव सतर्क असणारे ठाणेदार सुरज तेलगोटे यांना गोपनीय माहिती मिळाल्यावर त्यांनी रात्री 3 वा. कपिल पडधान यांना नाचनगाव (पुलगाव) येथून अटक केली. आणि त्यांचे विरुद्ध कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे पार्श्वभूमीवर मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन येथे कलम 151 (1) सीआरपीसी प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करून अटक करण्यात आली आहे.ठाणेदार तेलगोटे आणि त्यांच्या चमूवर या प्रशंसनीय कार्यासाठी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close