जाती- जातीत तेढ निर्माणकरु पाहणाऱ्या माजी आ.देवेंद्र भुयार यांनी सकल समाजाची माफी मागावी

ओबीसी संघटनेच्या वतीने जोडे मारो आंदोलनाने निषेध
अमरावती
महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटना जिल्हा अमरावती व बारा बलुतेदार समाजाच्या वतीने शनिवार दि.२२ रोजी राजकमल चौक, अमरावती येथे मोर्शी वरूड विधानसभा मतदार संघातुन मतदारांनी नाकारल्यामुळे पराभुत झालेले माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी वरूड येथील वार्ताहर तुषार अकर्ते यांनी वार्तापत्र लिहिल्याबद्दल त्यांना जातीचा उल्लेख करुन ” जातीचा विजय झाला तर मस्तावले का ? माझ्या विरोधात ब्र जरी उद्गारला तर गाठ माझ्याशी आहे. मी आता रिकामाच आहो” अशी धमकी दिली. जातीवाचक शिवीगाळ केले त्यामुळे जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा आणि समाजात भांडणे लावण्याचे प्रयत्न करीत असल्यामुळे माजी आमदार देवेंद्र भुयार यांचे फोटोला जोडो मारो आंदोलनातुन निषेध करण्यात आला. याप्रसंगी ओबीसी समाज नेते व आयोजन प्रमुख संजय मापले यांनी ज्या सर्व समाजातील मतदारांच्या मतामुळे ५ वर्ष सत्तेची चव चाखली त्याच समाजात वैमनस्य निर्माण करु पाहणाऱ्या देवेंद्र भुयार यांनी समाजाची माफी मागावी अन्यथा आंदोलन तिव्र करण्यात येईल असा ईशारा दिला. याप्रसंगी सर्वशाखीय माळी समाज महासंघाच्या जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या प्रा.डॉ.उज्ज्वला सुरेश मेहरे, युवा नेते राजाभाऊ चिंचमलातपुरे, आदीवासी नेते डॉ. शिवलाल पवार यांच्यासह आदींनी माजी आमदार भुयार
यांच्या गुंड प्रवृत्तीचा तिव्र शब्दात निषेध केला. याप्रसंगी संजय यावलकर, विजयकुमार चोपकर, अशोक पाटील, प्रदीप मानेकर, विलास विंचुरकर, संजय वाघोळकर, मधुकर मानकुटे, सुधिर गारोडे, सुभाष हिंगासपुरे, माणिक लोखंडे, सुनिल वासनकर, जी. जी. फसाटे, एस. बी. बनसोड तसेच कुणबी समाज, तैलिक समाज, सुवर्ण माळवी समाज, कुंभार समाज, नाभिक समाज सह बारा बलुतेदार संघटनेचे पदाधिकारी आणि सकल माळी समाजातील अनेक युवक व महीलांची उपस्थिती होती.