क्राइम

महिला शिपायाच्या मुलाने केला शिपायावर जीवघेणा हल्ला 

Spread the love

चाकूने कापला गळा ; कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडले 

गडचिरोली  / नवप्रहार डेस्क 

                   भूमिअभिलेख कार्यालयात कामावर असणाऱ्या शिपाई दिनेश काकडे यांचेवर वरिष्ठ कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत महिला शिपायांच्या मुलाने तो चहा घेण्यासाठी टी पॉईंट चौकात आला असता त्याच्या गळ्यावर चाकूने वार केला. जखमी अवस्थेत दिनेश वाचवा वाचवा म्हणत कार्यालयाकडे धावला. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याचेवर लगेच शस्त्रक्रिया केली. त्याच्या गळ्यावर 17 टाके पडले आहेत.

हा थरार टी-पॉईंट चौकात संध्याकाळी 4.30 वाजताच्या सुमारास घडला. गडचिरोली पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत हल्लेखोर युवकाला अटक केली आहे. जखमी शिपायावर तातडीने शस्रक्रिया करून 17 टाके लावण्यात आले. तूर्त त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.

सौरभ ताटीवार असे हल्लेखोर युवकाचे नाव आहे. त्याची आई भूमि अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयात शिपाई आहे, तर जखमी दिनेश काकडे हा कनिष्ठ कार्यालयात शिपाई आहे. गुरूवारी 4 वाजताच्या सुमारास दिनेश नेहमीप्रमाणे टी-पॉईंट चौकात चहा घेण्यासाठी गेला असताना सौरभ ताटीवार तिथे आला आणि त्याने आपल्याजवळ लपवून ठेवलेला धारदार चाकू काढत दिनेश काकडे यांच्या गळ्यावर चालवला. त्यामुळे काकडे यांचा गळा बराच कापला गेला. पण त्याही अवस्थेत त्यांनी जीव वाचवत आणि वाचवा-वाचवा असे ओरडत भूमी अभिलेख कार्यालयात धाव घेतली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आरोपी सौरभ याला अडवत पोलिसांच्या ताब्यात दिले.

रक्तबंबाळ झालेल्या दिनेश यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली. कापलेला गळा शिवण्यासाठी 16 टाके लागल्याचे समजते. दरम्यान आरोपी सौरभ याच्याविरूद्ध भादंवि कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close