घाटंजी कोंडवाडाच मोकाट परिस्थितीत कोंडवाडा बाबत कुठलीही उपाययोजना नसल्यामुळे मोकाट जणावरांचा हैदोस

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी येथिल मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी न.प. प्रशासन सप्सेल नापास ठरत असून मोकाट जनावरांचा बंदोबस्त कोण करणार? हा प्रश्न मोकाट जनावरांपासून त्रस्त नागरिक व मोकाट जणावरांचा शेतमालाची व घूसत मालनुकसानित शेतकरी वर्गातून होत आहे.नुक्तेच घाटंजी येथिल संजय मारावर यांनी कोंडवाड्यात त्यांचे शेजारील शेतातून शेतमाल नुकसान करत आलेली मोकाट गाय कउपआट ओलांडत त्यांचे शेतात शिरली व माल पिकाची नासधूस करत असतांनाच त्यांनी पकडून न.प. कोंडवाडा आणली पण तेथे कुठल्याही कर्मचारी बंदोबस्तासाठी नव्हता म्हणून त्यांनी सदर बाब न.प. मधे जाऊन तक्रार दिली असता न.प. कोंडवाड्याला वालीच नसल्याचे उघडकीस आले. उलट न.प. अधिकारी यांनी मोकाट जनावरे बाबत कोंडवाडा प्रोव्हीजन नसल्याचे सांगण्यात आल्याचे त्यांचे लिखीत तक्रारीत कळते त्यामूळे मोकाट जणावरांमूळे झालेल्या मालाचे शेतकऱ्यास नूकसान कोण देईल व मोकाट जणावरांचा बंदोबस्त कोण करेल? हा प्रश्न उभा राहिला आहे.