चोरांबा येथे शाहू महाराज पुण्यतिथी साजरी
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यातील चोरांबा येथे ग्रामपंचायत चोरांबा आणि जिल्हा परिषद शाळा चोरांबा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा येथे राजश्री शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी चा कार्यक्रम घेण्यात आला. सोबतच जि. प. शाळेतील आणि अंगणवाडीतील मुलांना ग्राम पंचायत चोरांबा यांचे कडून डिजिटल बुकाचे वाटप करण्यात आले यात जिल्हा परिषद शाळेतील 50 विध्यार्थी,अंगणवाडीतील 36 विध्यार्थी असे 86विद्यार्थी उपस्थित होते या सर्व विध्यार्थ्यांना डिजिटल बुकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला सरपंच उपसरपंच, ग्रा. प. सदस्य,ग्रामसेवक,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका,गावातील नागरिक, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवराणी राज्यश्री शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला आणि महाराजांनी शिक्षणासाठी केलेल्या कामाची महती विध्यार्थ्यांना समजावून सांगितले व वाल्मीक उरकूडे विजय रदंये विलास नागपूर समस्त नागरिक उपस्थित होते