क्राइम

गांजा तस्करी करणारा आरोपी १३.३२२ किलो गांजासह गजाआड

Spread the love

: स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई :-

पोलीस स्टेशन एम. आय. डी. सी. बुट्टीबोरी परीसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिणचे पथकास गोपनिय माहीती प्राप्त झाली की, मौजा MIDC पार्किंग येथील सार्वजनिक शौचालय जवळ दर्शन नावाचा इसम अवैधरीत्या अंमली पदार्थ गांजा बाळगुन विक्री करीत आहे. अशा मिळालेल्या माहीती वरून सदरचे पथकाने पोलीस ठाणे एम.आय.डी.सी बटुटीबोरी परिसरात मौजा MIDC पार्किंग येथील सार्वजनिक शौचालय जवळ सापळा रचुन आरोपी नामे- दर्शन रत्नाकर पारेकर, वय ३० वर्ष, रा. वार्ड क्र. ४, टाकळघाट, त. हिंगणा जि. नागपुर हा एका पांढऱ्या रंगाच्या बोरीमध्ये गुंगीकारक वनस्पती गांजा बाळगतांना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन एकुण १३.३२२ कि.ग्रॅ. अंमली पदार्थ गांजा किंमती अंदाजे १,३२,५४० /- रू., नगदी ७०० /- रू. असा एकुण १,३३,२४० /- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीला जप्त मुद्देमालासह पोलीस ठाणे एम.आय.डी.सी बुटीबोरी यांचे ताब्यात देवुन आरोपीं विरूध्द पोलीस ठाणे एम.आय. डी.सी. बुटीबोरी येथे NDPS Act अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात परि सहायक पोलीस अधीक्षक श्री. अनिल मस्के, परि. पोलीस उपअधीक्षक श्री. राहुल झालटे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरिक्षक राजीव कर्मलवार, अनिल राऊत, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, पोलीस हवालदार मिलींद नांदुरकर, निलेश बर्वे, दिनेश आधापुरे, मयूर ढेकले, इकबाल शेख, महेश जाधव, पोलीस नायक सत्यशील कोठारे, अमृत किनगे, रोहन डाखोरे, चालक सुमित बांगडे यांनी पार पाडली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close