Uncategorized

भरधाव कार उभ्या पिक अप वर आदळली , आठ लोकांचा मृत्यू

Spread the love

मृतांमध्ये हॉटेल मालकाचा समावेश , दोन मुलांसह पाच जण जखमी

पुणे / नवप्रहार ब्युरो 

                 उभ्या पिक अप वर सुसाट कार आदळल्याने झालेल्या अपघातात आठ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये हॉटेल मालकाचा समावेश आहे. पीक अप मधून सामान काढत असताना हा अपघात घडला आहे. यात सामान काढत असलेल्या हॉटेल मालकासह कार मधील असे एकूण आठ लोकांचा समावेश आहे. जेजुरी जवळच हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील जेजुरी मोरगाव रस्त्यावर कार आणि पीक टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात एका महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन मुलांसह पाच जण जखमी झाले आहेत. जेजुरी-मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीसमोर सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघाताने लोकांची एकच धावपळ झाली.

कसा घडला अपघात?

जेजुरीजवळील किर्लोस्कर कंपनीसमोर श्रीराम हॉटेलमध्ये पीकअप टेम्पोमधील साहित्य उतरविण्याचं काम सुरु होतं. जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पीकअप टेम्पोला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात टेम्पोतून साहित्य उतरवणारे हॉटेलचे मालक, कारमधील प्रवासी असे एकूण ८ जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन मुले, एक, महिला व दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

पिकअप टेम्पोला कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे आणि कारमधील तिघे जण जागेवरच ठार झाले. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close