सामाजिक

नागपूर महापालिकेत कंत्राटी शिक्षक पदभरती रद्द करावी- अँड. राहुल झांबरे यांची मागणी

Spread the love

 

प्रतिनिधी अमित वानखडे

नागपूर महापालिकेने दिनांक 13 जुलै 2023 ला वर्तमान पत्रात जाहिरात देत माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळेकरिता कंत्राटी शिक्षक भरती करिता माध्यमनिहाय व विषयनिहाय अनुक्रमे 63 आणि 20 पदांची जाहिरात प्रत्यक्ष मुलाखती द्वारे घेण्यासाठी काढली होती. ज्यामध्ये सर्व कंत्राटी शिक्षकांना सरसकट 25 हजार रुपये 11 महिन्याचा तात्पुरत्या स्वरूपात देण्याचे सांगण्यात आले आहे…मात्र या जाहिराती मध्ये अनेक त्रुटी असून यामध्ये मोठा घोळ झाल्याचे दिसून येत आहे.. कारण राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाने 30 जून 2016 ला GR काढीत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाचा सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी ( वर्ग 1 ते 8 ) शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) अनिवार्य केली आहे..तसेच 8 ते 10 आणि 11 ते 12 वर्गासाठीही TET आणि TAIT ही परीक्षा बंधनकारक केली आहे… असे असतांना नागपुर महापालिकेने दिलेल्या जाहिराती मध्ये अश्या कुठल्याही पात्रता परीक्षेचे निकष लावण्यात आले नाही.. ही सर्वात मोठी गंभीरबाब आहे. याशिवाय महापालिकेत शिक्षण घेणाऱ्या हजारो गरीब होतकरू मुलांवर मोठा अन्याय असल्याचा आरोप नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते अँड. राहुल झांबरे यांनी केला आहे तसेच जाहिराती मध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेचा उल्लेख करण्यात आला आहे.. मात्र सविस्तर जाहिराती मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही.. जे शिक्षक उमेदवारांना दिशाभूल करणारा आहे.. तसेच हे पदे महापालिकेत आकृतीबंध मंजूर असून यासाठी कायमस्वरूपी पदांची जाहिरात न काढता त्याला कंत्राटी पदे काढून महापालिकेतील प्रशासनाकडून मनमर्जी चालविण्याचा हा प्रकार दिसून येत आहे.जेणेकरून त्याचे हितसबंधातील सेवानिवृत्त लोकांना भरती केल्या जाता येईल…
याचप्रकारे माध्यमिक, उच्च माध्यमिक, व कनिष्ठ महाविद्यालय यांचा मानधनामध्ये कोणत्याही स्वरूपाची विभागणी करण्यात आली नसून सरसकट सर्वांनाच एकच मानधन लावण्यात आले आहे.. जे अन्यायपूर्वक आहे.. त्यामुळे कंत्राटी शिक्षक त्यांचा पदानुसार सन्मानपूर्वक मानधनापासून वंचित ठरले असल्याचेही अँड. राहुल झांबरे यांच्यासह अँड. नितीन गवई, अँड. प्रतीक पाटील, अँड. राजन फुलझले
यांनी यावेळी सांगितले आहे…महापालिकेत सध्या प्रशासक असल्यामुळे राज्य शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून किंवा कोणतेही नियम शिथिलतेचे आदेश न घेता बेकायदेशीर रित्या महापालिका प्रशासन कार्य करीत आहे..त्यामुळे राज्य सरकारने गैर कायदेशीर बाबी कडे लक्ष घालून नियम धाब्यावर बसविणाऱ्या व विद्यार्थांचा आयुष्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर करावाही करावी आणि पदभरती तात्काळ रद्द करावी अशी मागणी नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते अँड.राहुल झांबरे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यावेळी अँड. नितीन गवई, अँड. प्रतीक पाटील, अँड. राजन फुलझले उपस्थित होते…

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close