सामाजिक

अपघात की घातपात ; फिरायला आलेल्या पाच लोकांचा. खदाणीत मृत्यू 

Spread the love
नागपूर / विशेष प्रतिनिधी
              नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील कुही तालुक्यातील सुरगाव शिवारात असलेल्या एका खदाणीत एकाच कुटुंबातील चौघांचा आणि त्यांच्या सोबत असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आहे की घातपात याचा तपास कुही पोलिस करत आहेत.
                  प्राप्त माहिती नुसार कुही तालुक्यातील पाचगाव चौकी समोरील गर्ग खदानीत पाच मृतदेह सापडले आहेत. रोशनी चंद्रकांत चौधरी, ( ३२),  मुलगा मोहित चंद्रकांत चौधरी (१२) , मुलगी लक्ष्मी चंद्रकांत चौधरी (१०), तिन्ही रा. धुळे, रज्जो राऊत (३५) रा.नागपूर आणि एतिराज अन्सारी (२२) यांचा मृतकात समावेश आहे.
                   फिरायला गेलेले हे लोक रात्री उशिरा पर्यंत घरी न पोहचल्याने घरच्यांनी दोन पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेतला असता खदानीत लोकेशन मिळून आले. पोलिसांनी पाचही मृतदेह बाहेर काढले असून पंचनामा करून पोस्टमार्टम साठी पाठवले आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close