सामाजिक

पिकनिक साठी आलेल्या पाच विद्यार्थ्यांना जलसमाधी

Spread the love
 

चार मुली आणि एक मुलाचा समावेश, मुलींचे मृतदेह मिळालेले, मुलगा बेपत्ता

सिंधुदुर्ग  / नवप्रहार मीडिया 

                पुणे येथील खाजगी सैनिक अकॅडमितील देवगड येथे समुद्र किनाऱ्यावर पिकनिक साठी आलेले पाच पर्यटकांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला आहे. यात चार मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. मुलींचे मृतदेह मिळाले असून मुलगा बेपत्ता आहे. 

दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची 35 जणांची सहल देवगड येथे आली होती. समुद्रात आंघोळीसाठी पाच जण उतरले होते. त्यावेळी पाचजण बुडाले आहेत. सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर बेपत्ता आहे.

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल आली होती. समुद्र किनाऱ्यावर पोहचल्या नंतर आघोळ करण्याचा मोह पर्यटकांना आवरला नाही. त्यामूळे या गृपमधील काही जण समुद्रात आघोळीसाठी गेले. यातील पाच जण समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. यात चार मुली आणि एक मुलगा होता. चौघांचे मृतदेह मिळाले तर एक जण अजूनही बेपत्ता आहे. या घटनेची माहिती मिळण्यास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पोलीस सहकारी , तहसीलदार रमेश पवार नगराध्यक्ष साक्षी प्रभू घटना स्थळी दाखल झाले.

पुणे येथील पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. यातील पाच जण समुद्रात बुडाले. त्यापैकी चौघा मुलींचे मृतदेह सापडले असून एक विद्यार्थी बेपत्ता आहे. हि घटना दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारासची आहे. सर्व मृतदेह देवगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. यात मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर अजूनही बेपत्ता असून पोलिस स्थानिकांच्या मदतीने शोध घेत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close