उसने दिलेले पैशे मागायला गेलेल्या महिलेवर बलात्कार
अपहरण करून पुण्यात पुन्हा बलात्कार
अमरावती / प्रतिनिधी
पतीने उसने दिलेले पैशे मागण्यासाठी गेलेल्या महिलेवर तरुणाने बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार चांदुर बाजार पो.स्टे. च्या हद्दीत घडला आहे. यावेळी तरुणाने अश्लील चित्रफीत बनवून ती पतीला दाखविण्याची धमकी देऊन महिलेचे अपहरण करून पूना येथे नेऊन पुन्हा बलात्कार करण्यात आला.
रितेश भास्कर वानखडे (३२) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित ३० वर्षीय महिलेच्या पतीने रितेशला उसने म्हणून ५०० रुपये दिले होते. ते पैसे परत मागायला पीडित महिला ४ फेब्रुवारी रोजी दुपारी रितेशच्या घरी गेली. त्यावेळी रितेशने जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचवेळी महिलेचे अश्लील छायाचित्रे व व्हिडीओही काढला. ते पतीला दाखवितो, अशी धमकी देऊन त्याने महिलेला पुन्हा आपल्या घरी बोलावून लैंगिक शोषण केले. त्यानंतर त्याने सदर छायाचित्रांच्या आधारावर महिलेचे अपहरण करून पुणे येथे नेले. दरम्यान, पीडित महिला पुण्यावरून आपल्या गावी परतली. त्यानंतर पतीसोबत चांदूरबाजार ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी रितेशविरुद्ध बलात्कार, अपहरण व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
.