क्राइम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांना असे काही आढळले की पोलिसही हादरले 

Spread the love

गडचिरोली / नवप्रहार मीडिया नेटवर्क

               नाकाबंदी दरम्यान पोलिसांना असे काही आढळले की पाहून पोलिसही हादरले. त्यांनतर पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करणे सुरू केले आहे.कारण पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान  पोलिसांना पाहून एक दुचाकीस्वार थबकला आणि त्याने दुचाकी बाजूला थांबवली.व लगेच त्याने आणि त्याच्या साथीदाराने जवळील चटई नाल्यात फेकून पळ काढला.

एटापल्ली- कसनसूर मार्गावर नाकाबंदीदरम्यान पोलिसांना पाहून दोन संशयितांनी काही अंतरावर दुचाकी उभी करून पळ काढला.  एटापल्लीचे उपअधीक्षक डॉ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी रविराज कांबळे हे उपनिरीक्षक संतोष मोरे, सविता काळे व सहकाऱ्यांसमवेत १३ जुलै रोजी सकाळी कसनसूर मार्गावर नाकाबंदी करुन वाहनांची झडती घेत हाेते. यावेळी दुचाकीवरुन (एमएच ३३ डी- ५७४९) दोघे आले. पोलिसांना पाहून ते थबकले.

दोघांनी दुचाकी तेथेच उभी केली. त्यांच्याजवळ असलेली चटई त्यांनी एका नाल्यात टाकली व तेथून धावत सुटले. पोलिसांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जंगलातून पसार झाले. दरम्यान गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रत्येक संभाव्य बाजूने होतेय चौकशी – 

पोलिसांनी चटई उचलली असता त्याखाली दोन रायफल आढळल्या. या शस्त्रासह दुचाकी जप्त केली आहे. दोन्ही संशयित आरोपी नेमके कोण, रायफल जवळ बाळगण्याचा उद्देश काय, ते शिकारीवर निघाले होतेे की नक्षल्यांशी संबंधित होते, त्यांचा काही कट होता का, या बाबी अद्याप गुलदस्त्यात आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close