प्रशासना विरोधात शेतकरी झाले आक्रमक. मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर चक्काजाम
मोर्शी / प्रतिनिधी
वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असल्याने, परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाला वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. वन्य प्राण्या पाठोपाठ महावितरण कंपनीकडून देण्यात येणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना अनेकदा समस्येचा सामना करावा लागत आहे. हा प्रकार अनेक दिवसापासून सुरू असून, शेतकऱ्यांच्या समस्येकडे प्रशासन जाणून-बुजून दुर्लक्ष करीत असल्याने, परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या कारवार फाट्यावर चक्काजाम करून साडेचार पाच पर्यंत वाहने थांबून ठेवली होती. अखेरीस प्रशासनाने मध्यस्थी करून मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले. मात्र येथे पाच ऑक्टोबर पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला. या आंदोलनात दरम्यान परिसरातील शेतकरी, महिला शेतकरी व नागरीक मोठ्या संख्येने आंदोलनाकरिता कारवार फाट्यावर गोळा झाले होते. शेतकऱ्यांना होत असलेल्या समस्या उपस्थित अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या. प्रशासनाच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांना मागण्या मंजूर करणार असल्याचे आश्वासन यावेळी दिल्याने, त्यासाठी स्थगित करण्यात आले.