आदिवासी आश्रम शाळा अडगाव बु येथे वनमहोत्सव सम्पन्न.
तेल्हारा / प्रतिनिधी
सामाजिक वनिकरण परीक्षेत्र तेल्हारा यांचे सहकार्य ने स्थानिक आदिवासी आश्रम शाळा अडगाव बु. येथे वनमहोत्सव चे आयोजन दिनांक 1/8/2024 ला करण्यात आले होते.
कार्यकमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री संजय निमकर्डे सर हे होते. प्रमुख अतिथी मा. श्रीमती एस. एस. जयस्वाल मॅडम RFO, वनपरीक्षेत्रपाल श्री संतोष गिरणारे साहेब, वनरक्षक श्री संजय सुईवाल साहेब प्राथ. मुख्याध्यापक श्री गजानन अपाले सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरवात, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यांनतर अतिथीचे स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथीच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आदरणीय जयस्वाल मॅडम यांनी ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’, PLANT 4 MOTHER या संकल्पने बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय विदयार्थ्यांनी हस्तकलेने ”इको फ्रेंडली ”बनवलेल्या क्लाकृतिचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. अतिथीनी विदयार्थ्यांचे कौतुक केले. शालेय परिसरात हजारो वृक्षाची लागवड केली असल्याने शालेय परिसर वृक्ष वेलिनी नटून दिसत असल्याने, “GREEN ZONE SCHOOL ” OXIGEN ZONE SCHOOL ” अशा प्रकारे गौरव उदगार काढून श्रीमती जयस्वाल मॅडम यांनी विद्यालयाची स्तुती केली.या पूर्वी आमच्या विद्यालयाला महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वनश्री पुरस्कार देऊन गौरवीत करण्यात आले होते आमच्या विद्यालयाचे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे नाते वृक्षांची जोपासले जाईल असे प्राचार्य श्री संजय निमकर्डे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर. एम. धाकडे उच्च माध्यमिक शिक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी असे इंगळे मॅडमअधिक्षिका यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.