सामाजिक

दुचाकी अपघातात जखमी इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू

Spread the love

मोर्शी (प्रतिनिधी)दि.७/५
अंबाडा ते आस्टगाव मार्गावर दूचाकी च्या झालेल्या अपघातात जखमीचा अमरावती येथे उपचारादरम्यान मृत्यू
आष्टगाव दरम्यान -शनिवारी रात्री झालेल्या अपघातात एका (47) वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दि.6 मे रोजी संध्याकाळी 7 वाजताचे सुमारास घडली.अपघातात अचानक झालेल्या या युवकाच्या मृत्यूमुळे आष्टगाव येथील समाजमन सुन्न झाला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आष्टगाव येथील नामदेव गिरी वय (47)वर्ष हे मोर्शी येथे सींभोरा रोडवरील असलेल्या एका ढाब्यावर (हॉटेल) मध्ये मजुरी काम करीत होते.काल दि.6 मे रोजी त्यांना हॉटेलमधून सुट्टी असल्यामुळे ते आपल्या मोटरसायकलने काही कामानिमित्त आष्टगाव येथून अंबाडा येथे गेला होता .काम करून आपल्या गावी रात्री 7 वाजता आष्टगाव येथे परत येत असतांना अंबाडा ते आष्टगावच्या मध्यभागी त्यांची मोटरसायकल गाडी अचानक घसरून होऊन गाडीचे संतुलन बिघडल्यामुळे ते रोडवर कोसळल्यामुळे त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात जबर मार बसला होता .त्याला लगेच नागरिकांच्या मदतीने त्यांना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार केल्यानंतर त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.मात्र अमरावती येथील उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू शनिवारी रात्री झाला.अमरावती येथील मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.आज आष्टगाव येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात मृतकाच्या पार्थिवावर अंतिम संस्कार पार पडले.मृतक नामदेव गिरीचा अचानक अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण आष्टगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close