राजकिय

आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील सोसायटी शाळा ग्राऊंड येथे सायंकाळी  सभा

Spread the love

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनीलजी मेंढे व परिणय फुके यांचेसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते राहणार उपस्थित…

*भंडारा/जिल्हा प्रतिनिधी*

पंतप्रधान, नरेंद्र मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त जनसंपर्क अभियान अनुषंगाने भारत सरकार चे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आज शुक्रवार दिनांक १६/६/२०२३ रोजी भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील सोसायटी शाळा ग्राऊंड येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या जाहीर सभेला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनीलजी मेंढे , आ. विजय रहागडाले , राजकुमार बडोले ,बाळा काशीवार,भाजपा भंडारा जिल्हा अध्यक्ष शिवराम गिरीपूंजे , गोंदियाचे जिल्हा अध्यक्ष केशव मानकर व पक्षाचे वरिष्ठ नेते तसेचं समस्त भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजेरी लावनार आहे.
करिता या जाहीर सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close