एडवोकेट शिवानी सुरकार ठरल्या ऑल इंडिया बार काउंसिल परीक्षा पास करणाऱ्या विदर्भातून प्रथम तृतीयपंथी
वर्धा : नागपूर विद्यापीठातून एलएलबी ची पदवी प्राप्त केल्यानंतर वकिली व्यवसायाकरिता कठीण असणारी देश पातळीवर ऑल इंडिया बार काऊनसीलची परीक्षा देखील उत्तीर्ण करावी लागते. एडवोकेट शिवानी सुरकार हिने ही कठीण परीक्षा देखील पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या उत्तीर्ण केलेली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करणारी तृतीयपंथी कुमारी शिवानी सुरकार ही विदर्भातील प्रथमच तृतीयपंथी वकील आहे.एका मागून एक यशस्वीरित्या “सक्सेस स्टोरीज” देणाऱ्या तृतीयपंथी शिवानी सुरकार कॉलेजच्या काळामध्ये मेरीटच्या विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात होत्या. सध्या स्थितीत वर्धा सेशन कोर्टमध्ये एक हुशार वकील म्हणून त्यांची ख्याती निर्माण झालेली आहे, आणि त्या फक्त त्यांच्या मेहनतीवर आणि बुद्धीवर विश्वास ठेवतात असे ऐकण्यात आलेले आहे. भविष्यात त्यांना यशस्वी क्रिमिनल लॉयर बनून “आर्ग्युमेंट एक्स्पर्ट” बनायचे आहे व यासाठी त्यांचे यशस्वी प्रयत्न सुद्धा सुरू आहेत.आपल्या या यशाचे श्रेय त्यांनी स्वर्गवासी वडील संतोषराव सुरकार तसेच त्यांचे मार्गदर्शक एडवोकेट रुबिया बैग आणि सुप्रीम कोर्ट क्रिमिनल लॉयर डॉ. नागराज मांजरकर यांना दिले आहे. ऑल इंडिया बार ची परीक्षा उत्तीर्ण करणारी व्यक्ती ही भारतामध्ये कुठल्याही कोर्टात वकिली व्यवसाय करू शकते.