युवा स्वाभिमान पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी अजय देशमुख यांची निवड
अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध राजकीय पक्षांमध्ये संघटनात्मक बदल होतांना दिसत आहेत. काही पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकारी बदलले जात असून प्रत्येक पक्षाकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता युवा स्वाभिमान पक्षाने मिशन २०२४ ला सुरवात केली आहे. जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून युवा स्वाभिमान पक्षाने मोठा बदल केला आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा व खासदार नवनित राणा यांनी तरुण व तडफदार रुग्णसेवक म्हणून परिचित असलेले अजय देशमुख यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे रुग्णसेवक अजय देशमुख यांच्या निवडीने एक ओबीसी कुणबी समाजातील जिल्हाध्यक्ष मिळाला आहे देशमुख हे मुळचे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापुर चिंचोली येथिल आहे.
अजय देशमुख यांनी अनेक रुग्णांना जिवदान दिले असून त्यांना जिल्हास्तरापासुन ते केंद्रीय मंत्री स्तरापर्यंत रुग्णसेवक म्हणून पुरस्कार मिळाले आहे. देशमुख हे युवा स्वाभिमान पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष असताना त्यांच्या कामांचा धडाका पक्षाचे संघटनात्मक काम पाहून व पक्षाने आगामी निवडणुक लक्षात घेऊन अजय देशमुख यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्यांच्या निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाके व गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त केला
अमरावती जिल्ह्यामध्ये युवा स्वाभिमान पक्षाला संघटनात्मक अधिकाधिक पक्षाला बळकट करुन लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाला क्रमांक एकच्या स्थानी आणण्याचा संकल्प अजय देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यावर बोलुन दाखवले आहे