Uncategorized

एका नामांकित शाळेत असलेली शिक्षिका चालवत होती कुंटणखाना 

Spread the love

ठाणे / नवप्रहार डेस्क

                   शिक्षित लोकांची मानसिकता अतिशय खालच्या स्तराची असते याची प्रचिती काही वेळा येते. हे लोक चुकीचे काम पैशे कमावण्यासाठी करतात की त्यांच्यात विकृती असते हे सांगणे कठीण असते. एका नामांकित शाळेत नोकरी करणाऱ्या शिक्षिके कडून वेश्याव्यवसाय केला जात असल्याचा अविसश्वनीय प्रकार ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या कारवाई नंतर समोर आला आहे. मागील तीन वर्षांपासून ती वेश्या व्यवसाय चालवित असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

घोडबंदर येथील चितळसर मानपाडा भागात वेश्या व्यवसाय चालविणारी दलाल महिला बुधवारी तिच्या तावडीत असलेल्या काही महिलांना वेश्यागमनासाठी आणणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. के. वालगुडे, पोलीस हवालदार आर. यु. सुवारे, के. बी. पाटील, व्ही. आर. पाटील यांच्यासह पोलीस पथकाने सापळा रचून दलाल महिलेला ताब्यात घेतले.

तिची चौकशी केली असता ती मुंबईतील एका नामांकित शाळेत शिक्षिका असल्याचे समोर आले आहे. तसेच ती वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांची तिच्या तावडीतून सुटका केली आहे. तर वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close