जिल्हा परीषद पशुसंवर्धन विभागातील बोगस अपंग संजय गाडगे याची अपंगाच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करा
अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी याना निवेदन
अमरावती :जिल्हा परिषद अमरावती मध्ये नांदगाव खंडे, पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन केंद्र श्रेणी-२ फुबगांव येथील कार्यरत अपंग अनुशेष मधून नियुक्ती मिळविलेले बोगस अपंग संजय शाताराम गाडगे यांनी डॉक्टरांसोबत आर्थिक संगणमत करुन अपंग प्रमाणपत्र कर्णबधीर प्रवगांचे बनवून घेतले असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पशुधन पर्यवेक्षक संजय शांताराम गाडगे यांना मा. आरोग्य उपसंचालक अकोला यांचेकडे त्यांच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करण्याचे आपण आपल्या स्तरावरुन त्वरीत सक्तीचे आदेशीत करावे असे निवेदन अपंग जनता दल सामजिक संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे संघटनेने केलेल्या मागणीवर कार्यवाही न झाल्यास अपंग जनता दल सामाजिक संघटना जि. अमरावतीच्या वतीने कार्यालयावर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिले यावेळी राजिक शहा,रुस्तम शेख, प्रमोद शेबे, राहुल वानखडे,कांचन कुकडे,मयूर मेश्राम सह पदाधिकार्यांनी उपस्थित होते