सामाजिक

न.प.प्रशासनाच्या असहयोगामुळे बालगोपाळांचा तांन्हा पोळा ‘ काळा ‘ 

Spread the love
चांदुर रेल्वे / प्रतिनिधी
                  बालगोपाल मोठ्या आतुरतेने ज्या सणाची वाट पाहत असतात त्यापैकी तांन्हा पोळा हा एक सन. कारण या दिवशी बाळगोपालांना आपल्या मेहनतीची कमाई मिळणार असते. असे नसते की त्यांना पोळी म्हणून लोक जे काही देतील ते मिळाले नाही तर त्यांना भातका मिळणार नाही. पण या दिवशी साठी  त्यांनी आपल्या बैलांना सजवण्यासाठी जी मेहनत घेतलेली  असते त्याच्या परीक्षेचा दुवस असतो. पण खडकपुरा येथे न.प.प्रशासनाच्या असयोगामुळे अनेक बालगोपाळ हिरमुसले. कारण त्यांना अंधारात पोळा साजरा करावा लागला.यामुळे परिसरातील नागरिकांत कमालीची नाराजी पसरली आहे.
पोळा उत्सव समिती, खडक पुरा  तर्फे चांदूर रेल्वे येथे सालाबादा प्रमाणे याही वर्षी पोळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची रीतसर परवानगी घेऊन नगर परिषद  कार्यालयला तशी सूचना देण्यात आली लाईट व्यावस्था करून देण्याची विनंती करण्यात आली परंतु सुस्त प्रशासनाने खडकपुरा वासीयांच्या  विनंती ची कुठलीही दखल न घेता लाईट व्यवस्था करून दिली नाही त्यामुळे तान्ह्या पोल्यामध्ये आलेली बालगोपालाना तसेच मोठ्या पोळ्यात आलेल्या बैल जोडी मालक शेतकऱ्यांना अंधारातच पोळा साजरा करावा लागला.
परिसरातील जनतेत नाराजी – न प च्या आडमुठ्या धोरणामुलळे परिसरातील नागरिकांत कमालीची नाराजी पसरली आहे. येणाऱ्या काळात न प प्रशासनाला त्यांची जागा दाखवून देण्यात येईल या प्रकारची भाषा बोलल्या जात आहे. केवळ तांन्हा पोळाच नाही तर मोठ्या पोळ्यात देखील न प ने लाईट व्यवस्था करन दिली नव्हती हे विशेष .
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close