सामाजिक

युती बद्दल आत्ताच भाष्य करणे योग्य होणार नाही- डॉ.सुरेश माने

Spread the love
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – आगामी निवडणुकीत कोणाशी युती करणार याबद्दल आत्ताच भाष्य करणे योग्य होणार नाही. सर्वांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. असे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश माने  यांनी अनौपचारिक चर्चेत सांगितले.
स्थानिक  विश्राम भवन भंडारा येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश माने  आले असता त्यांच्याशी  संजीव भांबोरे यांनी संवाद साधून विविध विषयावर चर्चा केली  .यावेळी त्यांच्याशी चर्चा करताना डॉ. सुरेश माने म्हणाले की, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची स्थापना 9 ऑक्टोबर 2015 ला झाली असून 9 ऑक्टोंबर 2023 ला आठ वर्षे पूर्ण होत आहे. त्या दृष्टिकोनातून पक्षातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून पक्षाच्या विस्तार ८ राज्यात झालेले असल्याचे त्यांनी यावेळी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.  त्याचप्रमाणे येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत युती करायची की नाही यावर पत्रकार संजीव भांबोरे यांनी  प्रश्न उपस्थित केला असता यावर आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही योग्य वेळी निर्णय घेऊ असे त्यांनी यावेळी  सांगितले. त्याचप्रमाणे मान्यवर कांशीराम साहेबांची जी चळवळ आहे त्या चळवळीची निगडित आमचा पक्ष कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले .
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close