बंजारा समाजाच्या उत्थानासाठी बाबूसिंग राठोड यांचे भरीव योगदान – डॉ मधुकरराव पवार
अकोला / प्रमोद मोहरील
बार्शीटाकळी येथील गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे बंजारा समाजाचे आद्य समाज सुधारक श्रद्धेय बाबुसींहजी राठोड यांची ११७ वी जयंती डॉ मधुकरराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी मंचकावर संस्थेचे अध्यक्ष, डॉ मधुकरराव पवार प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ अनिल राठोड जी बी मुरारका महाविद्यालय शेगाव दिनेश राठोड लोहगाव प्राचार्य डॉ टी पी आगाशे संस्थेचे उपाध्यक्ष प्रल्हादराव पवार उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धेय बाबूसिंग राठोड यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या पूजनाने झाली तेव्हा बाबूसिंग राठोड यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता बाबूसिंग राठोड हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं एकूणच बंजारा समाजाच्या उत्थानासाठी त्यांचे भरीव योगदान असल्याचेही डॉ पवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले १९६९ मधील बाबुसिंग राठोड व तत्कालीन पंतप्रधान स्व इंदिरा गांधी तसेच वसंतराव नाईक यांच्यात झालेले संवाद १९५३ ला दिग्रस येथील बंजारा समाजाचे पहिले महाअधिवेशन तसेच लालबहादूर शास्त्री यांचे भाषन तसेच १९५२ मध्ये झालेला कुळ कायदा बाबूसिंग राठोड यांच्या प्रेरणेने, इंग्रजांच्या विरोधात सोमठाणा येथील जंगल चाराबंदी १९३७ मध्ये महात्मा गांधीजींच्या हस्ते बाबू सिंग राठोड यांचा कारंजा येथे झालेला झालेला सत्कार अशा विविध आठवणींना उजाळा देत बाबसिंग राठोड यांची महती तसेच बंजारा समाजामध्ये त्यांचे योगदान काय आहे हे डॉ पवार यांनी पटवून दिले याप्रसंगी प्राचार्य डॉ अनिल राठोड दिनेश राठोड प्राचार्य प्रा टी पी आगाशे यांचेही मनोगते झालीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डी एस राठोड यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विनोद उंढाळ यांनी तर आभार प्रदर्शन प्रा वैशाली कोटंबे यांनी केले एकूणच या कार्यक्रमाला डॉ प्रवीणकुमार राठोड डॉ बिस्मिल्ला खान डॉ अमित वैराळे प्रा अविनाश अहिर डी एस राठोड श्री नंदकुमार राऊत अधीक्षक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते