राजकिय

दिलेला शब्द पाळत केले विविध कामांचे भूमिपूजन

Spread the love
आमदार झाल्यानंतर मा.आ. राजे.डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांचा सिरोंचा तालुक्याचा पहिला दौरा
सिरोंचा / प्रतिनिधी
मा.आ.राजे डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी सिरोंचा तालुक्यातील परसेवाडा, नरसिंहपल्ली, टेकडा, जाफराबाद रेगुंटा परिसरात दौरा करून कार्यकर्त्यांची बैठक घेतली.आमदार झाल्यानंतर त्यांच्या पहिलाच दौरा असल्याने या भागातील राकॉच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.त्यानंतर आ.आत्राम यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या..!
विशेष म्हणजे निवडणुकीदरम्यान त्यांनी दिलेल्या शब्द पाळत येतील कंबालपेठा ते टेकडा रस्त्यावरील मोठ्या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. त्यानंतर परसेवाडा – चिकेला – जाफराबाद रस्त्यावर संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. तसेच त्यांनी या भागातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन बामणी आणि अमरावती येथे खरीप पणन हंगाम २०२४-२०२५ अंतर्गत धान खरेदी केंद्राचे शुभारंभ केले.!
याप्रसंगी कार्यकर्त्यांनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ता तथा राकॉचे ज्येष्ठ पदाधिकारी बबलू हकीम, सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, नगरसेवक जगदीश रालबंडीवार, नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक सतीश राचर्लावार, रामकीष्टू नीलम, रवी सुलतान, कोंडाय्या कटकु, सत्यनारायण परपटला, गोविंदा पेद्दी, वेंकटलक्ष्मी अरवेली, मधुकर मडावी, श्रीनिवास चिंतावार, कृष्णमूर्ती रिंकूला, लक्ष्मण येरावार, मारन्ना नीलम, सरशील अकनपल्ली, सर्गती नरेश आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close