क्राइम

वाहन चोरी विरोधी पथकाची दमदार कामगिरी; 24 तासात आरोपींना केले जेरबंद

Spread the love

तीन गुन्हे उघडकीस

नागपूर -/ अमित वानखडे

देवदर्शन करून घरी परतणाऱ्या 64 वर्षीय महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावून पळून गेलेल्या आरोपीला वाहन चोरी विरोधी पथकाने 24 तासाच्या आत अटक करून त्यांच्या कडून तीन गुन्ह्याची उकल क3ली आहे

थोडक्यात हकिकत अशी कि, घटना ता दि. 28/04/23 चे वेळ रात्री 9.15 वा. दरम्यान फिर्याद सौ . समता राजेश देवडीया वय 64 वर्षे रा. 221, मस्कासाथ, तेलीपुरा दयाराम अखाडा जवळ नागपूर ही शेजारी राहणारी निता जैन सोबत जैन मंदिर पवारपुरा येथे दर्शन करून पायदळ घरी जात असताना घटनास्थळी एका काळ्या रंगाचे मोटर सायकल जवळ उभे असलेल्या अनोळखी आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन किं. अन्दाजे 80,000/- ची जबरीने हिसकावून पळुन गेला अशा फिर्यादिचे रिपोर्टवरुन सदरचा गुन्हा नोंद दाखल करण्यात आला.

गुन्हे शाखा (डिटेक्शन) वाहनचोरी विरोधी पथकाने तांत्रीक व गुप्त माहीतीचे आधारे तपास करून पो. ठाणं जरीपटका अप क. 298 / 23 कलम 392 गादवी, पो. ठाणे लकडगंज अप. क. 257 / 23 क. 392 भादवी, पो. ठाणे गणेशपेठ अब 179 / 23 कलम 302 भादवी, गुन्हयातील चैन स्नॅचिंग करणा-या आरोपीची ओळख पटवुन आरोपीचा शोध घेवून त्यात शिताफिने गुन्हा घडल्याचे 24 तासाचे आत ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडुन एकुण 3 चैन स्न्याचिंगचे गुन्हे उघडकीस आणून आरोपीकडुन एकुण तिन सोन्याच्या चैन व एक रवा (लगड) असा एकूण मुद्देमाल वजन अंदाजे 3362 ग्रॅम किंमत अंदाज 1,80,000/-रु. गुन्हयात वापरलेली मो.सा. कि. अं. 70,000/-रु. असा एकूण 2,50,000/-रु. चा मुद्देमाल जप्त
करण्यात आला आहे.

तपास अधिकारी/ तपासमध्ये मदत करणारे पोलीस कर्मचारी
पोउपनि अनिल इंगोले, पोउपनि बलराम झाडोकर (सायबर सेल) व टिम, पोहवा. नामदेव टेकाम ब.नं. , पोहवा. दिपक रिठे, नापोशि. विलास कोकाटे ब.नं. , नापोशि. पंकज हेडाऊ ब.नं. , पो.शि. कपीलकुमार तांडेकर ब.नं. 6731, पोशि. अभय ढोणे सर्व नेमणुक वाहनचोरी विरोधी पथक, गुन्हे शाखा, नागपूर शहर

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त, अश्वती दोरजे यांचे निर्देशान्वये मा. पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) श्री मुमक्का सुदर्शन, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री मनोज सिडाम यांचे मार्गदर्शनाखाली वर नमुद टिमने केलेली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close