दर्यापूर मतदार संघात भाजपा कार्यकर्त्यात जुन्या कार्यकर्त्याला उमेदवारीची मागणी

भाजपातून विनोद दुर्गे आघाडीवर
दुर्गा उत्सावात हौशी उमेदवारांचा जनसंपर्कावर भर,
अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागण्याची चाहूल अवघ्या काही दिवसावर असतांना आचार सहिंतेपूर्वी हौशी ऊमेदवाराच्या प्रत्यक्ष भेटीगाठी सुरु झाल्या असून, ह्यामध्ये इच्छुकांची यादी ही दिवसागणिक वाढत आहे. युतीमधील प्रत्येक मित्र पक्ष आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी अशी मागणी करत असताना, दुसरीकडे उमेदवारी देताना पक्षातून आपल्या नावाचा विचार केला जावा, यासाठी कार्यकर्ते पक्षनेतृत्वाची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ज्याना तिकीट मिळण्याची शाश्वती नाही, त्यांनी मागचे सगळे विसरून पक्ष बदलण्याची तयारी केली आहे. यातच याआधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने घराघरांत कुटुंबांची तर मंडळाची भेट घेण्याची संधी तर आता नवरात्री उत्सावात इच्छुकाकडून भेटी, गाठी घेतली जात आहेत
दर्यापूर अंजनगाव मतदार संघात महायुतीच्या शिवसेनेचे माजी आमदार कॅ अभिजीत अडसूळ असून, याखेरीज ,, अंजनगाव तालुक्यात , भाजपकडून माजी आमदार रमेश बुदिले, विनोद दुर्गे गुरुजी,शिवसेना ठाकरे गटाकडून गजानन लवटे, विक्रम गजानन पारडे, प्रशांत अभ्यंकर,बबन विल्हेकर
तर काँग्रेस पक्षाचे गुणवंत देवपारे, अमित मेश्राम,सुधाकर तलवारे, अरुण वानखडे यांसारख्या इच्छुकांनी दर्यापूर मतदारसंघावर दांवा ठोकला आहे
परंतु भाजपा कार्यकर्यांमध्ये उमेदवार हा अंजनगाव, दर्यापूर तालुक्यातील असावा आणि तोही सुज्ञ, अनुभवी, कार्यकर्त्याची जाण असणारा अशी सर्वत्र चर्चा असून ह्यामध्ये विनोद दुर्गे गुरुजी हे आघाडीवर असल्याची सर्वञ चर्चा सुरु आहे,
भाजपा पक्ष हा हयावेळेस जुन्या कार्यक्रत्याचा विचार करणार की एखादा आयात केलेला उमेदवार देणार ह्याकडे शहर वासियांचे लक्ष लागले आहे