क्राइम

तरूणी घरून निघाली कार्यालयाला जाण्यासाठी आणि पोहचली हॉटेल मध्ये अन् घडले असे 

Spread the love

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी 

                  जुन्या दिल्लीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे कार्यालयाला जाण्यासाठी निघालेली तरुणी कार्यालयात न जात आपल्या बॉयफ्रेंड सोबत पोहचली हॉटेल मध्ये आणि घडले असे.

जाफराबाद येथील तरुणी घरून सकाळी 11 वाजता ऑफिस का जाण्यासाठी निघाली.पण ती आपल्या बॉयफ्रेंड सोबत हॉटेल मध्ये पोहचली. आणि नंतर जे घडलं ते भयंकर होत. येथे आपल्या बॉयफ्रेंड सोबत आलेल्या तरुणीची तिच्या बॉयफ्रेंड ने हत्या केली. ही घटना जुन्या दिल्लीतील लाहोरी गेट परिसरातील एका हॉटेल मध्ये घडली आहे. घटना 12 मार्च क्या रात्री 12.30 वा.दरम्यान घडली आहे. हॉटेल मधील तरुणांना रूम मधून कुठलीही हालचाल न आढळल्याने त्यांनीं अनेक वेळा दार ठोठावले पण आतून कुठलाच प्रतिसाद मिळत नव्हता.शेवटी पोलिसांना बोलाविण्यात आले.

पोलिसांनी दार उघडताच आत मध्ये तरुणी बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. पोलिसांनी तपासले असता तो मृत होती. तरुणी नेहमी प्रमाणे सकाळीं 11 ला ऑफिस मध्ये जाण्यासाठी घरून निघाली होती.पण ऑफिस का न जाता टोळी बॉयफ्रेंड सोबत हॉटेल मध्ये पोहचली. तो रात्री घरी न आल्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला आणि जाफराबाद ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

हॉटेल चे सीसीटीव्ही तपासले असता ती एका तरूणा सोबत हॉटेल मध्ये येतांना दिसत आहे. शोध घेतला असता त्या तरुणाचे नाव अभिषेक तिवारी असल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्हीत अभिषेक संध्याकाळी 5 वा. हॉटेल मधून बाहेर पडताना दिसत आहे.

पोलिसांच्या फॉरेन्सिक टीम ने रक्ताचे नमुने आणि इतर वस्तू गोळा केल्या आहेत आहेत अभिषेक तिवारी यांचेवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर मुलीचे कुटुंबीय शॉक आहेत. त्यांच्या मते त्यांना मुलीच्या तरुणासोबत हॉटेल मध्ये जाण्याची त्यांना कुठलीच माहिती नव्हती. पोलिस कॉल डिटेल्स आणि सोशल मिडिया वरून त्यांच्यातील संबंधाची माहिती घेत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close