मोर्शी येथे एनसीसी विभागातर्फे आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मुक्त सप्ताहाचे आयोजन
एनसीसी कॅडेट्सतर्फे दुकानदारांना कागदी पिशव्यांचे वितरण
मोर्शी / प्रतिनिधी
8 महाराष्ट्र एनसीसी बटालियन अमरावती यांचेशी संलग्नित स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेतील एनसीसी कॅडेट्स तर्फे बटालियन कमांडर कर्नल तुषार कथुरिया व ऍडम ऑफिसर ले.कर्नल मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली व एनसीसी ऑफिसर एस.आर.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मुक्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
प्लॅस्टिक विरोधात सामाजिक जनजागृती व्हावी या उद्देशाने 3 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मुक्त दिन म्हणून साजरा साजरा करण्यात येतो.प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या समस्या व पर्यावरणाच्या सुरक्षेतेसाठी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने व कागदी पिशव्यांचा अधिकाधिक वापर वाढवा या उद्देशाने एनसीसी कॅडेट्सनी मोर्शी शहरात प्रभातफेरी काढून भाजीबाजार दुकानदार,फळे दुकानदार,किराणा व इतर दुकानदारांना स्वतः बनवलेल्या कापडी व कागदी पिशव्यांचे वितरण करून प्लॅस्टिक पिशव्या ऐवजी सदैव कापडी व कागदी पिशव्यांचाच वापर करण्याची विनंती केली.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद देशमुख,जेष्ठ शिक्षक अजय हिवसे यांच्यासह राहुल धुडे,पुष्कर लेकुरवाडे,शुभम इंगळे,कार्तिक सोळंके,सुजल कडू,इंद्रजा बारस्कर,प्रांजली दातीर व सर्व एनसीसी कॅडेट्सनी अथक परिश्रम घेतले.याप्रसंगी एनसीसी कॅडेट्स कु.श्रुतिका देशमुख हिने प्लॅस्टिक पिशविचा वापर न करण्याबाबत एनसीसी कॅडेट्सना शपथ दिली.
—————————————-
काय आहे प्लॅस्टिक मुक्त दिन
2009 मध्ये पश्चिम युरोपमध्ये प्लॅस्टिक पिशवी वापरावर बंदी लावायला सुरवात झाली.त्यानंतर 2013 मध्ये बॅग्स फ्री वर्ल्ड ऑर्गनायझेशन या संस्थेने आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मुक्त दिन साजरा करायला सुरुवात केली.2015 मध्ये युरोपियन युनियनने सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घालण्यासाठी पाहिले पाऊल उचलले.2022 मध्ये सिंगल यूज प्लास्टिक पिशवीच्या वापरावर पूर्णपणे बंदी आणणारा बांगला देश हा पहिला देश बनला.भारतात सिंगल यूज प्लॅस्टिक पिशवीवर बंदी आहे.