हटके

प्रियकराने प्रेयसी नववधूला फिल्मी स्टाईल पळवून नेले

Spread the love

भोपाळ / नवप्रहार ब्युरो 

लग्न झालेल्या नववधूला तिच्या प्रियकरा कडून फिल्मी स्टाईल पळवून नेल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेश च्या भोपाळ मध्ये घडला आहे.  लग्नसमारंभात ब्युटी पार्लरवरून नटून थटून आपल्या रिसेप्शनला येत असलेल्या नवऱ्या मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. .

एवढेच नाही तर ज्या कारमधून नवरा-नवरीची वरात जाणार होती, ती कार देखील पंक्चर करून ठेवण्यात आली होती, असे समोर आले आहे.

नवरीला लग्न समारंभातून पळवून नेण्यासाठी बॉयफ्रेंडने फुलप्रूफ प्लॅन बनविल्याचे यावरून दिसत आहे. नवरदेवाच्या तक्रारीनंतर पोलीस तपासाला लागले आहेत. टीटी नगरच्या आशिष रजक याचे लग्न गंजबासौदाच्या रौशनी सोळंकीशी लागले होते. मुलीच्या गावातच लग्न लागले, तिथून बुधवारी नवरा-नवरी टीटी नगरला आले. बुधवारी रिसेप्शन ठेवण्यात आले होते. यासाठी नवरा नवरी दोघेही ब्युटी पार्लरला गेले होते. दोघेही एकाच कारने रिसेप्शनच्या ठिकाणी पोहोचले. एका बाजुने नवरा उतरला तर दुसऱ्या बाजुने नवरी. हा क्षण घडत असतानाच मोठा खेळ झाला.

नवरी ज्या बाजुने उतरली त्या बाजुने एक वेगाने कार आली आणि थांबली. एका तरुणाने नवरदेवाच्या बहिणीला धक्का दिला आणि नवरी रोशनीला कारमध्ये बसविले आणि काही कळायच्या आत वेगाने कार चालवत पसारही झाला. लोकांना सुरुवातीला वाटले नवरीला कोणीतरी किडनॅप केले. परंतू ही गोष्ट जेव्हा नवरीकडच्यांना समजली तेव्हा त्यांनी पळवून नेणारा कसा दिसत होता ते विचारले. तेव्हा त्यांना रोशनीच्या बॉयफ्रेंड अंकितनेच तिला पळविल्याचे समजले. मंगळवारीच तिचे लग्न झाले होते, संधी मिळताच पळून जाण्याचा प्लॅन रोशनी आणि तिच्या बॉयफ्रेंडने आखला होता.

या प्रकारानंतर नवरदेवाला लिंक लागत गेली. लग्नावेळी नवरा-नवरी जाणारी कार पंक्चर झाली होती. ती पंक्चर झाली नव्हती, तर करण्यात आली होती. त्या कारचे टायर फाडण्यात आले होते. यामुळे नवरा-नवरीला वरातीच्या बसमधून यावे लागले होते.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close