दादा मला जीवे मारू नको पीडितेने नराधमाकडे केली होती विनंती

पुणे /नवप्रहार ब्युरो
स्वारगेट बस अत्याचार प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी दत्ता गाडे यांच्या वकिलांचे म्हणणे आहे की झालेला प्रकार पीडितेच्या सहमतीने घडला. ती यावेळी ओरडली नाही किंवा तिने स्वतःचा बचाव केला नाही असे डिफेन्स लॉयर चे म्हणणे आहे. पण तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बलात्कारा नंतर आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत तिचा गळा आवळल्याने तिने मरणाच्या भीतीने दादा मला मारू नको अशी विनवणी केल्याचे समोर आले आहे. तसेच ही दुर्दैवी घडत असताना तिने बचावासाठी आरडाओरड केली नाही असे देखील आरोपीच्या वकिलांचे म्हणणे आहे.पोलिसांनी तपास केला असता घटना घडलेल्या बस मधून आवाज बाहेर येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
.
पीडितेला आपण बसमध्ये कंडक्टर असल्याचे खोटे सांगून आरोपी तिला घेऊन गेला. ती बसमध्ये जाताच त्याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला. त्यानंतर पीडितेने बसमध्ये कोणीच नाहीये, मला खाली जायचे आहे, मला खाली जाऊ दे, अशी विनवणी केली. त्यानंतर आरोपीने पीडितेला बसच्या सीटवर ढकलून दिले. पीडितेने मदतीसाठी आवाजही दिले; मात्र आरोपीने तिचा गळा दाबला. आरोपीने आपल्याल जिवंत सोडावे यासाठी ती बचावाच्या प्रयत्नात होती.
आरोपीच्या खात्यात महिनाभरापासून २३९ रुपये
स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणात आरोपीचे वकील न्यायालयात संगनमताने हा प्रकार झाल्याचे सांगतात. त्यावेळी आरोपी दत्तात्रय याने काही पैसे दिल्याचेदेखील सांगितले गेले. तपासात मात्र आरोपीच्या बँक खात्यात घटनेपूर्वी महिनाभरापासून केवळ २३९ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी अशा परिस्थितीत कुठून पैसे देईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांनी तपासले दोघांच्या मोबाइलचे २ वर्षांचे सीडीआर
पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी दत्तात्रय आणि पीडितेच्या मोबाइलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासण्यात आले आहेत. त्यात कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसून न आले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्याच्याकडे याचना : काय करायचे ते कर, मला जीवंत ठेव…
पीडिता घाबरली आहे, ती प्रतिकार करत नसल्याचे लक्षात येताच नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केल्याची बाब याप्रकरणात समोर आली. तिने काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना नराधमाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आरोपी दत्तात्रय बसमधून उतरल्यानंतर पीडितेने बसने गावाला जात असताना तिच्या मित्राला आणि बहिणीला फोनद्वारे तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी पीडितेला धीर देत स्वारगेट पोलिस ठाण्यात जात आरोपीविरोधात तक्रार देण्याचे सांगितल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दत्ता गाडे याने गळा दाबून जीवे मारायची धमकी दिली होती. तरुणीचे फलटणला जायचे तिकीट ही पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा केलं होतं. मुलीने प्रतिकार केला नसल्याच पोलिस उपायुक्त आणि गृहराजमंत्र्यांनी वक्तव्य केलं होतं. मात्र आरडाओरडा केल्याचा पीडितेनं जबाब दिला. एसी एसटीला खिडक्या नसल्याने बाहेर आवाज येत नसल्याचंही निष्पन्न झालं. पोलिसाकडून बसमध्ये चढून आवाज बाहेर येतो की नाही याची ही तपासणी करण्यात आली.
वैद्यकीय समुपदेशक असल्याने वेस्ट बंगालच्या घटनेप्रमाणे आपल्याला ही मारून टाकतील अशी पीडीतेला होती भीती. त्यामुळेच दादा मारू नको अशी विनंती पीडितेनं आरोपीकडे केल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला. दुसरीकडे आरोपी निर्दोष असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी करत पीडितेवर अत्यंत गंभीर आरोप लावले होते. त्यापैकी वकिलांनी केलेला एक दावा खोटा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यामुळे वकिलाच्या दाव्यातली हवाच काढली गेली.
आरोपी दत्ता खाडेने पीडित तरुणीला पैसे दिल्याचा वकीलांचा दावा खोटा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपीचे बँक स्टेटमेंट देखील पोलिसांनी पडताळून पाहिले. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीच्या खात्यावर केवळ 239 रुपये शिल्लक होते. त्यामुळे वकिलाने केलेला दावा हा खोटा असल्याचं समोर आलं. चोऱ्या करून जगणार्या आरोपीच्या पैसे देण्याच्या वकीलाच्या दाव्याची हवाच पोलिस तपासात निघाली आहे.