सरस्वती ईग्लीश स्कुल मधे लिटील चॅम्प साठी सायबर जागृती कार्यशाळा संपन्न
बाळासाहेब नेरकर कडून
हिवरखेड येथील सरस्वती इंग्लिश स्कूल येथे सायबर सुरक्षा लिटिल चॅम्प हा कार्यक्रम राबविण्यात आला यामध्ये लहान मुलांना मोबाईलद्वारे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो आणि मोबाईल चा सदुपयोग कसा केला पाहिजे याबद्दल त्याना माहिती दिली आणि मोबाईल वर गेम्स न खेळता मैदानी खेळ आपण खेळले पाहिजे यासाठी त्यांना प्रोत्साहित केले यामध्ये विद्यार्थीनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन मोबाईलच्या योग्य आणि कमीत कमी वापर करण्यासाठी शपथ देण्यात आली.
ही कार्यशाळा शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला यांच्या सहकार्याने व क्विक हिल फाऊडेशन, पुणे आणि महाराष्ट्र सायबर सेल, मुंबई यांच्या सहयोगाने प्राचार्य डॉ. जे. एम. साबू सर आणि उपक्रमाचे समन्वयक डॉ. एच. जे. खरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती. यामध्ये सायबर वॉरियर्स अनिकेत विजय भुडके व सुमित संजय सपकाळ यांनी संपूर्ण माहिती सांगून कार्यशाळा संपन्न केली. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य प्रेमिला मानकर मॅडम यांनी सूद्दा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षिका भुडके मॅडम, अस्वार मॅडम शिक्षकेत्तर कर्मचारी चवरे सर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यशाळेच्या आयोजनासाठी खंडेलवाल महाविद्यालयातर्फे अनिकेत यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.