प्रतीपंढरपुर की भ्रष्टाचाराचा अड्डा?

श्री संत केजाजी महाराज मंदिरात लाखोंचा खेळ,सचिव डॉ धंदरे संशयाच्या भोवऱ्यात
राजेश वरटकर
सेलु (वर्धा ) : विदर्भातील प्रती पंढरपुर म्हणुन ख्याती असलेल्या श्री क्षेत्र घोराड येथील श्री संत केजाजी महाराज मंदिरात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराने आता संतापाचा कळस गाठला आहे. महाराष्ट्र तथा गुजरात राज्यातील भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले मंदिर आज उघडपणे गैरव्यवहारांचे अड्डे बनल्याचे चित्र समोर येत असुन, सचिव डॉ. सुरेश धंदरे यांचा कारभार पुर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
मंदिराचा हिशोब तपासण्यासाठी दररोज हजार रुपये देऊन सिंदी रेल्वे येथील किशोर दाते नावाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, स्वतः सचिव बाजुच्या खुर्चीवर बसुन तमाशा पाहत आहेत आणि कारभार खाजगी लोकांच्या हाती दिला जात आहे. हा प्रकार म्हणजे नियमांला उघडपणे पायदळी तुडवण्यासारखा असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
गावातील “स्वयंभु नेत्याच्या” इशाऱ्यावरच सर्व निर्णय घेतले जात असल्याचे बोलले जात असुन, मंदिराचा कारभार राजकीय हस्तक्षेपाखाली गेल्याचे स्पष्ट होत आहे. बाहेरगावाहुन आलेल्या व्यक्तींची दादागिरी इतकी वाढली आहे की, स्थानिक नागरिकही गप्प बसण्यास मजबुर झाले आहेत.
एकेकाळी ट्रॅक्टर चा हफ्ता भरायला पैसे नसल्याने कुटारात ट्रॅक्टर लपविणारा स्वयंभु गाव नेता आज कोट्यवधींची भाषा करत असल्याने “पैसा कुठुन आला?” हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्र्यांच्या नावाचा वापर करीत धर्मदाय आयुक्तांवर दबाव टाकुन मंदिर कमेटीत तात्पुरते स्वरूपात निवड करण्यात आलेला स्वयंभु गाव नेता व इतर तिन विश्वस्त कायम स्वरुपी सदस्य होण्यासाठी मंदिरातीलच पैसे कोर्टात खर्च करीत असल्याचा गंभीर आरोपही समोर येत आहे.
दरम्यान, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि तरुणाई यांनी ही कमेटी बरखास्त करण्यासाठी पुढाकार घेतला होता तर एका कामगार नेत्यांने यांवर आक्षेप नोंदवण्यासाठी स्वाक्षरी अभियान राबवुन स्वतः चा उदोउदो करण्यात धन्यता मारणारा याविषयावर चुप्पी साधत असल्याने यांची भुमिका संशयास्पद ठरत असुन, भ्रष्ट व्यवस्थेसमोर नतमस्तक होत असल्याचे चित्र आहे.
“गाव करी ते राव न करी” ही म्हण उलटी होऊन आता “राव करी ते गाव न करी” अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या नावाखाली राजकीय स्वार्थ साधण्याचा आरोप होत असुन, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर या सर्व घडामोडींना वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाविकांचा संताप उसळला
“आमच्या श्रद्धेच्या मंदिराला भ्रष्टाचाराचे माहेरघर बनवणाऱ्यांना तात्काळ हाकलुन लावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडु,” असा इशारा भाविकांनी दिला आहे.
*भाविकांचा सनसनीत प्रश्न*
*मंदिराचा हिशोब कोणाच्या ताब्यात?
*सचिव की खाजगी व्यक्ती?
*राजकीय दबावाखाली चालतोय का कारभार?
*रामनवमी उत्सवात दानपेटीतील तसेच रोख रक्कम कोणाच्या घरी
*मंदिराच्या शेतातील ठेक्याचे पैसे घरी ठेवणारा गुरु कोण?
*पुण्यतिथी महोत्सव मध्ये मंदिराची रंगरंगोटी करण्यासाठी अडीच लाखांचे रंग खरेदी करणारा झारीतील शुक्राचार्य कोण?
*मंदिर कमेटीत जाऊन प्रती पंढरीला साक्षात पंढरपुर बनवण्याची भाषा करणारे नवनियुक्त विश्वस्त मंदिरात न जाता घरुनच करतात देवदर्शन
*मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी की लक्ष्मी दर्शन घेण्यासाठी भर दुपारी जातो स्वयंभु गाव नेता मंदिरात?
