पधारें अयोध्या के श्रीराम! रामलल्लच्या स्वागतासाठी धुनची धुम
मुबई / प्रतिनिधी
प्रभू रामचंद्रांच्या जयघोषात 22 जानेवारी 24 रोजी अयोध्येतील श्रीराम भुमीत प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येसह सारा देश श्रीरामाच्या या अभूतपूर्व सोहळ्याकडे लक्ष देऊन राहिले आहे.
हिंदू धर्माचे भगवे झेंडे, पताका, तोरण, मंगलमय सनई सुर, यानी रामलल्लच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज झाली आहे. याच पाश्र्वभूमीवर उत्तर प्रदेशासह महाराष्ट्रात “पधारें अयोध्या के श्रीराम” या गीतांनी सोशल मीडियावर धुम मचवली आहे. अल्पावधीतच युट्यूबवर सहासष्ट हजारावराचा पल्ला पार पाडणारे गायक, संगीतकार अमरेश शाहाबादी यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असतांना आम्ही लवकरच लाखांचा पल्ला पार पाडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्रीराम केवळ एका धर्माचे नव्हे तर साऱ्या विश्वाचे पालनहार आहे, अयोध्येतील श्रीप्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठानने हिंदुस्थानात राम राज्य येणार आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी गोवा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. गायक, संगीतकार अमरेश शाहाबादी, सहगायिका अंजली यादव यांनी रामभक्तांसाठी “पधारें अयोध्या के श्रीराम” हे गीत गायिले आहे. छट मय्या हे छट पुजेवरील विशेष गीत, नवरात्र उत्सव प्रसंगी दुर्गा माँ, गणेश उत्सवात गणपती बाप्पा मोरया, अशा प्रकारच्या धार्मिक गीतांची रचना संगीतकार अमरेश शाहाबादी यांनी केली आहे.